शहडोल: टोमॅटोच्या सततच्या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्यांनाच्या खिशालाच बसतो असं नाही तर त्याचा थेट परिणाम आता कौटुंबिक जीवनावरही होऊ लागला आहे. शाहडोल जिल्ह्यातील बेम्हौरी गावातील रहिवासी संजीव कुमार वर्मा यांच्या कौटुंबिक जीवनात टोमॅटोमुळे भूकंप आला आहे. संजीवने भाजीत महागडे टोमॅटो टाकले. यामुळे पत्नीला एवढा राग आला की ती रागाच्या भरात पतीचे घर सोडून निघून गेली आहे.आता या बिचाऱ्या नवऱ्याने पुन्हा कधीही आयुष्यात टोमॅटो वापरणार नाही अशी शपथ घेतली आहे. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले असून संजीवने धानपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून बायकोच्या शोधात पोलिसांची मदत मागितली आहे. शाहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलिस स्टेशन हद्दीतील बेम्हौरी गावात राहणारा संजीव वर्मा एक छोटासा ढाबा चालवतो. त्यासोबतच टिफीन सेवाही चालवतो. दोन दिवसांपूर्वी बायकोला न विचारता त्याने भाजीत टोमॅटो टाकला. हा प्रकार त्याच्या बायकोला समजताच ती संतापली. संजीवची पत्नी संतापून आपल्या लहान मुलीसह घर सोडून कुठेतरी निघून गेली.चुकीबद्दल संजीव बायकोकडे विनवणी करत राहिला, परंतु त्याने तिचं काहीही ऐकले नाही आणि घर सोडून कुठेतरी निघून गेली. आता संजीवला टोमॅटोचे आयुष्यातील महत्त्व कळले आहे. ज्या टोमॅटोने त्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप आणला, तो टोमॅटो आयुष्यात कधीही वापरणार नाही अशी शपथ त्याने आता घेतली आहे. टोमॅटोमुळे घर सोडून गेलेल्या बायकोला शोधून द्या, अशी विनंती संजीवने पोलिसांना केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत धानपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी नवऱ्याने तक्रार दिल्याचे सांगितले. टोमॅटोमुळे त्याच्या बायकोने घर सोडले आहे. तक्रारीत संजीवने सांगितले की, भाजीमध्ये तीन टोमॅटो टाकले, त्यामुळे बायको रागावून निघून गेली. त्यांच्या बायकोचा शोध लागला असून त्यांच समजूत काढून त्या लवकरच संजीवच्या घरी परततील असंही पोलिसांनी सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mzDBISs
No comments:
Post a Comment