Breaking

Wednesday, July 12, 2023

Wimbledon 2023 : नोव्हाक जोकोविचचा उपांत्य प्रवेश, फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी https://ift.tt/LbJNmEX

लंडन : नोव्हाक जोकोविच आणि टेनिसमधील विक्रम हे समीकरणच झाले आहे. त्याने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत असाच विक्रम नोंदविला आहे. ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची त्याची ही ४६वी खेप. त्याने अशी कामगिरी बजावत रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली. जोकोविचने आंद्रे रुब्लेव्हची झुंज ४-६, ६-१, ६-४, ६-३ अशी मोडून काढत आगेकूच केली.सध्याच्या पिढीतील टेनिसपटूंसाठी ग्रँडस्लॅम जिंकणे हे ध्येय असले तरी त्याआधी नोव्हाक जोकोविचचा प्रतिकार मोडून काढणे हे मुख्य लक्ष्य असते. ही बाब जोकोविचही जाणतो. 'त्यांना काय हवे आहे हे मला ठाऊक आहे; पण ते अजून झालेले नाही', अशी प्रतिक्रिया जोकोविचने दिली.सबालेन्काची आगेकूचअरिना सबालेन्काने बुधवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत केला. बेलारूसच्या दुसऱ्या सीडेड सबालेन्काने उपांत्यपूर्व फेरीत मॅडिसन कीजवर ६-२, ६-४ अशी मात केली. सेंटर कोर्टवर पार पडलेल्या लढतीत सहाव्या सीडेड ऑन्स जबेरने तिसऱ्या सीडेड रिबाकिनावर ७-६ (७-५), ६-४, ६-१ अशी मात केली. बोपण्णा उपांत्य फेरीतकारकिर्दीतील अखेरच्या टेनिस मोसमात खेळणाऱ्या रोहन बोपण्णाने दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डनसह खेळणाऱ्या रोहन बोपण्णाने टॅलॉन ग्रीक्सपूर-बार्ट स्टीव्हान्स या नेदरलँड्सच्या जोडीवर ६-७ (३-७), ७-५, ६-२ अशी मात केली. एब्डन-बोपण्णा जोडीला स्पर्धेत सहावे सीडिंग आहे. त्यामुळे आता या जोडीकडून चाहत्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत ही जोडी कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.पहिला सेट गमावल्यानंतरही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व लढत जिंकणारी ऑन्स जबेर ही दुसरी टेनिसपटू ठरली. सेरना विल्यम्सनंतर विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत सलग दुसऱ्या वर्षी धडक मारणारी जबेर ही दुसरी टेनिसपटू ठरली. सेरेनाने २०१८ व २०१९मध्ये अशी कामगिरी केली होती. १४आपला उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी यानिक सिनर यांच्यापेक्षा जोकोविच १४ वर्षे ८६ दिवसांनी मोठा आहे. विम्बल्डन उपांत्य फेरीच्या इतिहासात प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रथमच वयाचे एवढे अंतर असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X1KNUY9

No comments:

Post a Comment