लखनऊ: उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात मंगळवारी संध्याकाळी चार जण एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात घुसले. त्यांनी घरातील १८ वर्षीय केला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना विरोध करताच टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सुरज कुमार राय यांनी दिली. 'आरोपींनी माझ्या मुलीला लक्ष्य केलं. त्यांनी तिची छेड काढली. तिचे कपडे फाडले. आम्ही विरोध करताच त्यांनी आमच्यावर हल्ला केला. विशाल कुमार, संजय कुमार, शीलू आणि छोटू अशी चौघांची नावं आहेत. चौघे घरात शिरले असताना काही जण आमच्या घराबाहेर उभे होते,' असं पीडित घरमालकानं सांगितलं. ते एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत आहेत. सर्व हल्लखोर आरोपी २० ते ३० वर्ष वयोगटातील आहेत. आरोपींनी पीडित कुटुंबाच्या घरावर दगडफेक केली, घरात तोडफोड केली. 'हल्लेखोरांनी मुलीच्या डोक्यात वीट घातली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. माझी दोन मुलंदेखील जखमी झाली आहेत,' असं पीडितांनी सांगितलं. शेजारपाजारचे लोक आमच्या घराबाहेर जमल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. मात्र जाता जाता त्यांनी आम्हाला मारण्याची धमकी दिली. आरोपी जवळपास अर्धा तास आमच्या घरात होते. पण आमच्या बचावासाठी कोणीच धावून आलं नाही, अशी खंत पीडितांनी बोलून दाखवली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nEZb06e
No comments:
Post a Comment