Breaking

Friday, July 14, 2023

अमेरिकेचा चीनला दणका, भारताच्या बाजूनं ठराव मंजूर, सीनेटनं जिनपिंग सरकारला फटाकरले https://ift.tt/hzf5yUc

वृत्तसंस्था, सॅन फ्रान्सिस्को : अरुणाचल प्रदेशबाबत कायम वादग्रस्त दावा करणाऱ्या चीनला अमेरिकेने अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. अरुणालच प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचा निर्वाळा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकी सीनेटच्या समितीने याविषयीचा महत्त्वपूर्ण ठराव गुरुवारी मंजूर केला. हा ठराव आता सीनेटमध्ये (वरिष्ठ सभागृह) मतदानासाठी मांडण्यात येईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अमेरिकेचा ऐतिहासिक दौरा केला होता. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीनेटच्या समितीने मंजूर केलेला हा ठराव भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जेफ मर्कले, बिल हॅगर्टी, टिम केन आणि ख्रिस व्हॅन हॉलन या सीनेट सदस्यांनी हा ठराव मांडला होता. सीनेटच्या समितीने हा ठराव मंजूर केला. अरुणाचल प्रदेश व चीनमध्ये मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा आहे यावर या ठरावाद्वारे पुन्हा पुष्टी करण्यात येत आहे. अरुणाचलचा मोठा भूभाग हा आमचाच आहे, हा चीनचा दावा तथ्यहीन असल्याचेही हा ठराव स्पष्ट करतो. हा दावा म्हणजे चीनच्या आक्रमक व विस्तारवादी धोरणाचाच एक भाग आहे, असे यात म्हटले आहे. जगभरातील विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन करताना, त्याविषयी कृती करताना व त्या देशांशी संबंध राखताना स्वातंत्र्य व नियमांच्या आधारित व्यवस्था ही आमची मूल्ये केंद्रस्थानी राहणे गरजेचे आहे. चीनचे सरकार अरुणाचलच्या संबंधात वारंवार समांतर भूमिका मांडत असताना तर याची अधिक गरज आहे. या प्रश्नी अमेरिकेचा व समविचारी देशांचा भारतास भक्कम पाठिंबा आहे, असे या समितीचे सहअध्यक्ष जेफ मर्कले यांनी स्पष्ट केले.

चीनसाठी मोठा धक्का

भारताचे लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री, राजनैतिक अधिकारी यांच्या अरुणाचल दौऱ्यास चीनने वेळोवेळी विरोध दर्शवला आहे. अरुणाचल हा आमचा भूभाग असल्याने भारतीय नेत्यांनी तेथे येऊ नये, अशी चिथावणीखोर भाषा चीनने नेहमी केली आहे. परंतु अमेरिकेच्या या स्पष्टोक्तीनंतर चीनची बाजू लंगडी पडणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nzruiKP

No comments:

Post a Comment