नवी मुंबई: दररोजच्या जेवणात वापरला जाणारा टोमॅटोने चांगलाच भाव खाल्ला आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे चक्क एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या टोमॅटोवर एका चोरट्याने संधी साधून डल्ला मारला आहे. दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव वाढत चालले आहे. टोमॅटोला सोन्याचा भाव मिळाल्यापासून गृहिणीत सोडा साधा व्यापारीही एकही टोमॅटो फेकून देत नाही. याचाच फायदा घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये दररोज रात्रीचे टोमॅटो चोरीला जात होते. अनेक व्यापारी हे संभ्रमात होते. मात्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून टोमॅटो चोर समोर आला आहे. आतापर्यंत आपण सोने चांदी गाड्या मौल्यवान वस्तू चोरी झाल्याच्या घटना ऐकल्या होत्या. मात्र आज चक्क एपीएपसी मार्केटमध्ये टोमॅटो चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. एका बाजूला देशभरात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या असताना देशातल्या सर्वात मोठ्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीतून टोमॅटो चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात टोमॅटोचा दर किलोला दीडशे रुपयेपर्यंत पोहचला आहे. बाजार समितीमधून रात्रीच्या अंधारात चोर टोमॅटो चोरत आहेत. यावेळी काही व्यापाऱ्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/swYogbI
No comments:
Post a Comment