म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पाऊस आणि गरम भजी हे हमखास हिट समीकरण आहे. पाऊस सुरू होताच भज्यांची फर्माइश झाल्याशिवाय राहत नाही. सध्या पावसामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण आहे. अशात खाद्यतेलाचे दरदेखील स्थिर आहेत. तेव्हा पावसाळ्यातील या मनमोहक दिवसांचा आनंद चमचमीत पदार्थांच्या स्वादाने द्विगुणित करण्याची संधी नागपूरकरांना आहे.मागील महिनाभरापर्यंत खाद्यतेलाचे दर वाढलेले होते. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांत दरवाढ झालेली नाही. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पंधरा लिटरच्या डब्याचा दर १६०० ते १८०० रुपये आहे. यामध्ये मागील मागील काही दिवसांत दरवाढ झाली नाही. त्याचा चांगला परिणाम विक्रीवर दिसून येत आहे. त्याशिवाय राइसब्रान तेल वापरणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. याचादेखील दर जैसे थे अवस्थेत आहे. राइसब्रानचा पंधरा किलोचा डबा १,६८० रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सनफ्लॉवरचा दर १७०० रुपये आहे. आपल्याकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथून सरसू तेलाची आवक होते. याचा दर १९०० ते २३०० रुपयांदरम्यान आहे. तर चांगल्या दर्जाच्या सरसू तेलाचा दर २,३५० रुपये आहे. जवस तेलाचा दर १७०० रुपये आहे. त्याशिवाय खाण्याऐवजी सर्वाधिक मॉलिश आणि इतर आयुर्वेदिक उपायांसाठी वापरल्या जाणाऱ्या तिळाच्या तेलाचा दर २,८५० रुपये आहे, अशी माहिती खाद्यतेलाचे व्यापारी दत्तात्रेय येनुरकर यांनी दिली. वाढ होण्याची शक्यता कमीचसध्या हिंदी भाषिक लोकांचा श्रावण महिना सुरू आहे. तर पुढील महिन्यात मराठीजनांचा श्रावण सुरू होईल. तेथून पुढे विविण सण-उत्सव राहतील. साधारणपणे, गणपती-गौरीपर्यंत तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. तसेच दिवाळीतदेखील अचानक मागीलवर्षीप्रमाणे दरवाढ होणार नाही. दर वाढले तरी ते एकदम हजार रुपयांनी वाढणे शक्य नाही, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी ग्राहकांना स्थिर दरांचा दिलासा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LE0yqiw
No comments:
Post a Comment