Breaking

Wednesday, July 19, 2023

लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून शरद पवारांची नात झाली पदवीधर, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट https://ift.tt/Mawq2Av

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची नात आणि खासदार यांची कन्या हिनं अर्थशास्त्रात मोठं यश संपादन केलं आहे. रेवतीनं लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट देखील केली. रेवतीची आई, खासदार सुप्रिया सुळे या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ' आमची कन्या रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. आजच तिचा निकाल आला असून तिचे पालक म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. पण तिचा हा ग्रॅज्युएशनचा प्रवास आम्हाला अनुभवता आला नाही याचे दु:ख वाटतेय, पण हेच आयुष्य आहे.'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथूनच मिळवली पीएचडी ही जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेतून जगभरातील अनेक महान व्यक्तींनी शिक्षण घेतलं आहे. भारतातील थोरांनीही येथे शिक्षण घेतलं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच संस्थेमधून अर्थशास्त्रातली आपली पीएचडी केली आहे. तसेच माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन, माजी संरक्षण मंत्री व्ही. के. मेनन, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले ज्योती बसू यांनीही याच संस्थेतून शिक्षण घेतले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EguOqmT

No comments:

Post a Comment