पुणे: स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदीर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. १९ जुलै) म्हणजेच आज पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पिस्टल मधून तीन राउंड फायर करण्यात आले असून संबंधित व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्या व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि तीन पुंगळ्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे, हे मात्र समजू शकलेले नाही. गणेश कला क्रीडा मंदीर जवळील डायमंड हॉटेल समोरील रस्त्यावर गोळीबाराची ही घटना घडली आहे. रिक्षातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरील एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना जागी तीन पुंगळ्या मिळून आलेल्या आहेत. तसेच, रस्त्यावर रक्त सांडल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. एका व्यक्तीने स्वारगेट पोलिसांना गोळीबार झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे. पण, पुण्यात स्वारगेट सारख्या भागात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MtFh4u8
No comments:
Post a Comment