Breaking

Saturday, July 29, 2023

Maharashtra Weather: राज्यात पावसाची असमान कृपा'वृष्टी', एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे तूट https://ift.tt/GRnes3u

मुंबई : राज्यातील पाऊस जुलैमधील सरासरीच्या १७ टक्के अतिरिक्त ठरला आहे. मात्र, राज्यभरात पावसाचे प्रमाण असमान आहे. कोकणात अतिरिक्त पावसाची नोंद होत असताना, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. ऑगस्टमध्ये राज्यात फारसा पाऊस पडणार नसल्याचे अनुमान असल्याने आधीच तूट असलेल्या भागांत पुढील दोन महिन्यांबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोकण आणि गोवा विभागांमध्ये अतिरिक्त पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र विभागात सरासरीइतकाच, तर मराठवाडा विभागामध्ये सरासरी पाऊस १३ टक्के अतिरिक्त नोंदला गेला आहे. विदर्भ विभागातही १४ टक्के पाऊस अतिरिक्त आहे. मात्र, विभागवार पावसाचे हे चित्र जुलैअखेरीस समाधानकारक असले, तरी हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात मात्र समाधानकारक नाही. जुलैअखेरच्या आठवड्यामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. राज्यात चार जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर २२ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीत पाऊस आहे. यातही जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली असली, तरी संबंधित शहरांमध्ये पाऊस नाही, अशीही स्थानिकांची तक्रार आहे.कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हा वगळता इतरत्र अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा तसेच पालघर जिल्हा येथे अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. मात्र, कोकण विभागात अलिबाग आणि रत्नागिरीमध्ये पावसाची तूट आहे. २९ जुलैच्या नोंदीनुसार अलिबाग केंद्रावर सरासरीपेक्षा ७५७.८ मिमी पाऊस कमी नोंदला गेला आहे. तर रत्नागिरी केंद्रावर ९५.८ मिलीमीटर पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे.मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे ३१ टक्के आणि २४ टक्के पावसाची तूट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाऊस सरासरीच्या श्रेणीत असला, तरी या जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाची १२ टक्के तूट आहे. धुळे जिल्ह्यातही सहा टक्के तूट नोंदली गेली आहे. अहमदनगर केंद्रावर सरासरीहून १३९.१ मिमी पाऊस कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाच टक्के पाऊस अधिक असला, तरी कोल्हापूर केंद्रावर मात्र १७४ मिमी पावसाची तूट आहे. नाशिक जिल्ह्यातही असेच चित्र आहे. जिल्ह्यात सरासरीहून १२ टक्के पाऊस जास्त आहे. मात्र, नाशिक केंद्रावर १३३.६ मिमी पावसाची तूट आहे. यावरून जिल्ह्यातील सरासरी गाठली असली, तरी शहरांमध्ये किंवा संबंधित केंद्रांवर पुरेसा पाऊस पडलेला नाही, हे चित्र समोर येत आहे. अकोला जिल्ह्यात ५ टक्के तूट, अमरावतीत नऊ टक्के तूट आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन टक्के तूट नोंदली गेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीहून अधिक आहे. भंडारा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमधील पाऊस सरासरीहून २४ टक्के अधिक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये २९ जुलैला ११ टक्के पाऊस आहे. मात्र, नागपूर केंद्रावर सरासरीपेक्षा ४०८.३ मिमी पाऊस कमी आहे.मराठवाडा विभागामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक तूटमराठवाडा विभागामध्ये जालना जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक म्हणजे ३८ टक्के तूट आहे. संभाजीनगर जिल्ह्यात १४ टक्के, बीडमध्ये सात टक्के, हिंगोलीत १५ टक्के पावसाची तूट आहे. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात तीव्र अतिरिक्त म्हणजे ८१ टक्के पाऊस पडला आहे. तर लातूरमध्ये ३५ टक्के पाऊस अतिरिक्त आहे. विभागातील या असमतोलामुळे सरासरी आकडेवारीचे चित्र बदलले आहे. विदर्भ विभागातही हा असमतोल दिसून येतो. मात्र, मराठवाड्याच्या तुलनेत गेल्या दोन आठवड्यांमध्ये दिलासा मिळाला आहे.शेतीवर परिणामराज्यातील पावसाच्या या असमान वृष्टीचा परिणाम स्थानिक भागातील शेती उत्पादनावर झाला आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी शेतकरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याचे सांगत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o9hPJqK

No comments:

Post a Comment