म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेने विद्याविहार ते ठाणे आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे लोकल २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. माहीम-सांताक्रुझदरम्यान शनिवारी रात्री ब्लॉक घोषित करण्यात आल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे
स्थानक : विद्याविहार ते ठाणेमार्ग : पाचवी आणि सहावी मार्गिकावेळ : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०परिणाम : ब्लॉकवेळेत मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक जलद अप आणि डाऊन मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील.हार्बर रेल्वे
स्थानक : कुर्ला ते वाशीमार्ग : अप आणि डाऊनवेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०परिणाम : ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान ट्रान्सहार्बरवरील लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.पश्चिम रेल्वे
स्थानक : माहीम ते सांताक्रुझमार्ग : डाऊन धीमा मार्गवेळ : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३०परिणाम : ब्लॉकवेळेत मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत. जलद लोकल फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.सध्या पावसाळ्याचे दिवस असून रेल्वे विभागाकडून दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जातो. येत्या रविवारी म्हणजे उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घोषित कऱण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना रविवारी लोकलनं प्रवास करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं घराबाहेर पडताना मुंबईकरांनी रेल्वेच्या वाहतुकीतील बदल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रेल्वेकडून या बदलामुळं होणाऱ्या अडचणींसाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XgzAkwR
No comments:
Post a Comment