Breaking

Sunday, July 9, 2023

Mumbai News: पणच पण! महततवककष जलबगदयच कम परण; य महपलक कषतरल हणर लभ https://ift.tt/4DWdPAH

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : तुंगारेश्वर अभयारण्याखालील जल बोगद्याचे महत्त्वाकांक्षी काम मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले आहे. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील हा बोगदा असून त्यातील पाण्याचा लाभ मिरा-भाईंदर व वसई-विरार महापालिका क्षेत्राला होणार आहे.वसई-विरार, मिरा-भाईंदर उपप्रदेश हा भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरी समूहांपैकी एक आहे. साधारणतः शहरे ५ ते १० टक्के दराने वाढतात, परंतु हा प्रदेश जवळपास ५० टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. यामुळेच या भागातील पाण्याची मागणी सातत्याने वाढती आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष जलवाहिनी सूर्या धरणापासून टाकण्याचा महत्त्वाचा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे.या प्रकल्पांतर्गत विक्रमगड तालुक्यातील सूर्या धरणामधील पाणी धरणाच्या खालील बाजूस असलेल्या कवडास उदंचन केंद्रामार्फत वेती गावाजवळील सूर्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. तेथून हे पाणी प्रक्रियेनंतर भूमिगत जलवाहिनीद्वारे गुरूत्वाकर्षण पद्धतीने आधी वसई-विरार व त्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या वितरण केंद्रात आणले जाईल. ही भूमिगत जलवाहिनी तुंगारेश्वर अभयारण्यातून जाणार असल्याने वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये यासाठी तेथे विशेष बोगदा खणला गेला आहे. अभयारण्याखालील या ४.४ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. तसेच या बोगद्यामधून पाणीपुरवठा करण्यासाठीचा प्रकल्प ८९ टक्के पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.या योजनेतील कवडास येथील उदंचन केंद्राची क्षमता ४३२ दशलक्ष लिटर प्रतिदिवस आहे. तेथून हे पाणी ज्या सूर्यानगर (वेती गाव) जलशुद्धीकरण केंद्रात येणार आहे, त्याची क्षमता ४१८ दशलक्ष लिटर प्रतिदिवस आहे. या केंद्रामधून हे पाणी वसई-विरार व मिरा-भाईंदरपर्यंत आणण्यासाठी ८०.७१ किमी जलवाहिन्यांचे जाळे टाकले जात आहे. मनोरजवळ मेंढवणखिंड येथेदेखील १.७० किमी लांबीचा बोगदा खणला जाणार आहे.पाण्याचे हे लाभार्थी...या प्रकल्पातून वसई-विरार महानगरपालिकेला दररोज १८५ दशलक्ष लिटर तर मिरा-भाईंदर महानगरपालिकेला २१८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. भूमिगत जल वाहिनीद्वारे वसई-विरार शहरातील काशिदकोपर व मिरा-भाईदर शहरातील चेने येथील जलाशयास घाऊक प्रमाणात या पाण्याचा पुरवठा होईल. त्यांची क्षमता अनुक्रमे ३८ व ४५ दशलक्ष लिटर प्रति दिन आहे. पुढे पाणीपुरवठ्याची जबाबदारी संबंधित महापालिकेची असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/v4pbrBu

No comments:

Post a Comment