Breaking

Sunday, July 9, 2023

कगरसच आमदर अजतददचय सपरकत लवकरच तयच रषटरवदत परवश कबनट मतरयन फडल बमब https://ift.tt/K4VET02

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ आता काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याची चर्चा वेगाने सुरू आहेत. काँग्रेसचे नेते अजितदादांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असं वक्तव्य यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे मंत्री यांनी केलं आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे जळगावात आगमन झालं आहे. यादरम्यान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज जळगाव शहरात अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. यावर बोलताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं. याच विषयावर बोलताना राष्ट्रवादीचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी म्हटलं की, "काँग्रेसचे अनेक आमदार खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील". आमची दार खुली, एकनाथ खडसे यांनी अजित दादांसोबत यावं"आमची सर्व दारं ही खुली आहेत. कोणत्याही नेत्याला आम्ही तोच मान सन्मान देवू. जो नेता अजित दादा यांच्यासोबत काम करणार असेल त्याचं आम्ही घरी जावून स्वागत करू, असं अनिल पाटील म्हणाले. आजही जे नेते इकडे तिकडे असतील किंवा संभ्रमावस्थेत असतील त्यांना हात जोडून विनंती की त्यांनी एक संघ व्हावं. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्यात बळकट करण्यासाठी ताकद देऊ. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी एक दिलाने कशी पुढे नेता येईल, हे पाहू...""आमचं आवाहन आहे की गल्लीपासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत ज्यांना दादांसोबत काम करायचंय, त्यांनी आमच्याकडे यावं-आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. यात एकनाथ खडसे असतील, देवकर असतील किंवा माजी मंत्री सतीश पाटील असतील... जे जे लोक आज अजित पवार यांच्यासोबत नसल्याचे दाखवत आहेत, त्यांच्याशीही आम्ही संपर्क करु".


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/H5v2beX

No comments:

Post a Comment