Breaking

Tuesday, July 11, 2023

Pune News: CAने दिली मित्राला मारण्याची सुपारी, बांधकाम साइटवर मारण्याचा डाव; पण... https://ift.tt/jtW89sm

म. टा. प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यावसायिक कारणावरून भागीदाराला मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका चार्टर्ड अकाउंटंटचा (सीए) समावेश आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि ४० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.विवेक नंदकिशोर लाहोटी (वय ४२, रा. शाहूनगर, चिंचवड), सुधीर अनिल परदेशी (वय २५, रा. साईधाम सोसायटी, केशवनगर, वडगाव, ता. मावळ), शरद साळवी यांच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकातील पोलिसांनी एका गुन्ह्यात सुधीर परदेशी याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तुले आणि १६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याबाबत तपास करताना परदेशी याच्याकडील शस्त्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली. परदेशी आणि साळवी यांनी मध्य प्रदेशातून तीन पिस्तूल आणि ४० काडतुसे आणली. त्यातील एक पिस्तूल आणि २४ काडतुसे सीए विवेक लाहोटी याच्याकडे ठेवली होती. परदेशी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचा सीएशी कसा काय संबंध आला, त्याने सीएकडे पिस्तूल का ठेवली, याबाबत पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी लाहोटी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि २४ काडतुसे जप्त केली. लाहोटी याच्याकडे तपास करताना त्याने व्यावसायिक भागीदार राजू माळी याला मारण्यासाठी सुधीर परदेशी याला ५० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. त्याचे पुरावेही देखील पोलिसांनी लाहोटी याच्याकडून जप्त केले.मध्य प्रदेशातून आणले पिस्तूलसीए विवेक लाहोटी याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. राजू माळी (रा. सोमाटणे फाटा, मावळ) हा त्याचा व्यावसायिक भागीदार आहे. राजू माळीसोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतून लाहोटी याने त्याच्या मैत्रिणीमार्फत राजू याला मारण्याची सुपारी परदेशी याला दिली. या कामासाठी परदेशी आणि साळवी यांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणि काडतुसे आणली.बांधकाम साइटवर मारण्याचा डावराजू माळी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सातारा जिल्यातील बांधकाम साइटवर जातात आणि तिथेच मुक्काम करतात. याच ठिकाणी माळी यांना मारण्याचा कट आरोपींनी रचला. तिथे काही घडल्यास पोलिसांना लवकर सुगावा लागणार नाही, असा विचार करून त्यांनी ते ठिकाण निवडल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी हा कट उधळून लावला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MS9TWbY

No comments:

Post a Comment