धुळे : धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या प्रियंका स्पोर्ट्स या दुकानाला भीषण लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने ही विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.शहरातील जुन्या महानगरपालिकेजवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुल येथील नामांकित प्रियंका स्पोर्ट येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वस्तू खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. प्रियंका स्पोर्ट या दुकानात नेमका खरेदीचा हंगाम सुरू असताना कमाईवर पाणई फेरले आहे. आग नेमकी कशी लागली अद्यापही समजू शकलेले नाही. आग लागल्याची चर्चा संपूर्ण शहरभर झाल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. महानगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत इतरही काही नागरिकांनी देखील आग विझविण्यासाठी हातभार लावला. तासनतास आग विझवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण होत नव्हते. महानगरपालिकेचे कर्मचारी व अग्निशमन दलाची संपूर्ण टीम या कामासाठी कार्यरत होती. ज्याप्रकारे अग्निशमन टीमला प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठेही वस्तुस्थिती दिसली नाही. याबाबतीत धुळेकर नागरिकांमध्ये अग्निशामक विभागवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शासन या विभागासाठी लाखोंचा खर्च करते, परंतु त्याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत काही होतांना दिसत नाही. त्यामुळे या यंत्रणेत सुधारणा करण्याची नित्यांत गरज असल्याची चर्चा धुळेकर नागरिकांमधून यावेळी व्यक्त केली जात होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/g09zXqe
No comments:
Post a Comment