: आंबोली घाटात दरड कोसळणाऱ्या वळणाच्यालगत मध्यरात्री मध्य प्रदेशातील पर्यटकांची कार खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतेही दुखापत झाली नाही. ही कार दरीतील झाडाला अडकल्याने आतील प्रवासी बचावले. भरधाव वेगात असल्यामुळे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्ता देसाई व कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी त्याठिकाणी जाऊन घाटात खाली अडकलेल्या ५ प्रवाशांना सुखरूप वर आणले. रात्रीच्या वेळी काळोखात प्रवासी अडकले होते. तरीही अंधरातून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत केली आणि आंबोलीत आणले. पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि त्यांच्या कामगिरीबाबत संबंधित पर्यटकांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान,शनिवारी सायंकाळी अभी कांबळे, राजेश नाईक दीपक शिंदे व मनीष शिंदे यांना घाटात पडलेली ठिकानावरून बाहेर काढली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/713YtmW
No comments:
Post a Comment