कोल्हापूर: पवार एके पवार म्हणणारे हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज पहिल्यांदाच खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा निर्धार मेळावा देखील पार पडला मात्र पक्षात झालेल्या बंडामुळे हसन मुश्रीफ यांना शरद पवार यांची भेट ही घेता आली नाही याची खंत ही त्यांनी दुपारी बोलून दाखवली होती. निर्धार सभा ही त्यांनी ऑनलाइन पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिल्याचे समोर आले आहे. दरम्यान या सभेत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शरद पवारांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
आजच्या सभेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तर, दुसरीकडे शरद पवार यांनी भाषणाच्या अंतिम टप्प्यात मुश्रीफांवर भाष्य केलं. शरद पवारांनी त्यांना आलेली ईडीची नोटीस, त्यांनी केलेला ईडीचा सामना याबाबत सांगितलं. तर दुसरीकडे त्यांनी हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या नोटीसनंतर सामोरं जाण्याऐवजी भूमिका बदलली, असं ते म्हणाले. घरच्या महिलांनी धाडस दाखवलं पण कुटुंबाचे प्रमुख दाखवू शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. या भाषणात शरद पवार यांचा रोख हसन मुश्रीफांकडे होता पण त्यांनी प्रत्यक्ष नाव घेतलं नाही.मुश्रीफांनी सभा पाहिली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा हसन मुश्रीफ यांनी पाहिल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. आता हसन मुश्रीफ काय उत्तर देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.शाहू महाराजांचं सभेत परखड भाष्य
राज्यात पक्षात झालेल्या फुटी नंतर आज पहिल्यांदाच शरद पवार यांचा कोल्हापुरात निर्धार मेळावा पार पडला. कोल्हापुरातील दसरा चौकातील मैदानात ही सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे या सभेच्या अध्यक्ष स्थानी शाहू महाराज छत्रपती होते. यावेळी त्यांनी देखील भाजप कडून सुरू असलेल्या जातीयवादी राजकारणावर नाव न घेता नाराजी दर्शवली असून आजच सरकार पक्षांतर कायद्याला कशा पद्धतीने बगल दिली जात आहे हे दिसत असून राज्यात तीन-तीन वेळा सत्तांतर होत आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत हेच सुरू असत असे ही ते यावेळी म्हणाले. असून पक्षांतर कायद्यात बदल होणे गरजेचे आहे असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आज आपण एका महत्वाच्या सभेला आलो आहात असे म्हणत मध्यंतरी कोल्हापुरात आणि राज्यात काही वेगवेगळ्या घटना घडल्या आणि त्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि शरद पवार हे पुरोगामी विचार पुढे नेत आहेत. कोल्हापुरात शाहू महाराजांनी जो विचार दिला तो कोणताही पक्ष असो त्याला पुढे न्यावा लागतो.कोल्हापूर जिल्हा हा अनेक वर्ष शरद पवार यांच्या सोबत राहिला. मात्र अलीकडे जिल्ह्यात काय घडत आहे हे कोणाला लक्षात येत नाही, असे ते म्हणाले. शाहू महाराज म्हणाले काही दिवसांपूर्वी एक मंत्री भेटायला आले होते. तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की हे कसं आणि का घडलं आहे हे त्यांनी मला स्पष्टीकरण द्यावं, मात्र मला अद्याप स्पष्टीकरण मिळालं नाही. बहुतेक त्यांना वेळ मिळाला नसेल. मात्र, आपण आता जाब विचारायला हवा असे शाहू महाराज म्हणाले आहेत. तसेच कोल्हापुरात जे घडत ते राज्यात आणि देशात घडतं. आपल्याला शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे न्यायचा आहे. याच विचारांनमुळे भारताला स्वतंत्र मिळाला.आज ७५ वर्ष झाली असली तरी आपण चुकीची दिशा पकडत आहे का असे अनेकांना वाटत आहे अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या कार्यक्रमामुळे हा जिल्हा नाही तर संपूर्ण राज्य चांगल्या विचाराच्या बाजूने जाईल अशी अपेक्षा असून समविचारी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे ही शाहू महाराज म्हणाले आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nFuCio2
No comments:
Post a Comment