Breaking

Friday, August 4, 2023

रत्नागिरीतील 'त्या' तरुणीच्या मृत्यूचं गूढ उकलणार, व्हिसेरा चाचणीत सारं काही समोर येणार https://ift.tt/6w9j70p

रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी दाभोळ समुद्रकिनारी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. चार-पाच दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते सांगून निघालेल्या निलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला किंवा तिने आत्महत्या केली किंवा कसे हे गूढ अद्याप कायम आहे.दरम्यान, चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील २४ वर्षीय निलिमा चव्हाणचा मृतदेह मंगळवारी डोक्यावरील केस व भुवया नष्ट केलेल्या अवस्थेत दाभोळ खाडीत आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील गूढ कायम असले तरी निलिमाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे समजते.निलिमा चव्हाण खेड बसस्थानकात चिपळूणकडे जाणार्‍या एसटीत बसली होती. मात्र ती चिपळूणला पोहचली नाही. मग ती कोणत्या थांब्याला उतरली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. वाहक-चालकांचाही जबाब घेण्यात येणार आहे. यातून महत्वाची माहिती मिळेल, असा विश्‍वास पोलिसांना आहे. तसेच निलिमाचा मोबाईल यानंतर बंद दाखवत होता. तो रात्री १२ वाजता अंजनी स्टेशनजवळ कसा काय सुरू झाला? हे तपासातून कॉल डिटेल्स देखील तपासण्यात येणार आहेत.दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नातेवाईक आणि नाभिक समाज बांधवांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. नीलिमा ही खेड चिपळूण या एसटी बसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. तसेच ती एका मुलीबरोबर बसून दापोली एसटी बसमधून खेड येथे उतरल्याचे दिसत आहे. तर यावेळी एक तरुण तिला भेटला होता. हा तरुण आणि ती मुलगी नीलिमाला का भेटले? याची माहिती पोलीस घेत आहेत. मृतदेह आढलून आला त्यावेळी नीलिमाच्या डोक्यावरती केस नव्हते. भुवयावरती केस नव्हते. त्यामुळे हे सगळे प्रकरण आता संशयास्पद बनले आहे. त्यामुळे या मुलीला भेटलेला तो तरुण कोण? याची माहिती आता पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yCcmeS0

No comments:

Post a Comment