कोटा: भाऊ आणि वडिलांसह मिळून एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. राजस्थानमधील कोटा येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीची फक्त हत्याच केली नाही तर त्यानंतर खोलीत खड्डा खणून तिचा मृतदेह तिथेच पुरला. दोन दिवसांनंतर जेव्हा दुर्गंधी येऊ लागली आणि मृतदेह फुगून बाहेर येऊ लागला. यानंतर आरोपींनी मृतदेह बाहेर काढून नाल्यात फेकून दिला.नाल्यात अज्ञात मृतदेह असल्याची माहिती कोणीतरी रेल्वे कॉलनी पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला. महिलेच्या हातावर एसएम बुद्ध असे लिहिले होते. पोलिसांनी या दिशेने तपास पुढे नेला आणि ३१ जुलै रोजी पोलिस ठाण्यात शालू महावर नावाच्या महिलेच्या बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याचे पोलिसांना समजले.यानंतर पोलिसांनी शालू महावरचा पती बंटी महावर याला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. मात्र, त्याने मृतदेह ओळखण्यास नकार दिला. पोलिसांनी शालूची बहीण ज्योती महावर यांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर ज्योतीच्या अहवालावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. ज्योती महावर यांनी पोलिसांना सांगितले की, बंटी आणि शालूचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. पण, २०२१ मध्ये दोघांमध्ये मतभेद झाले. शालूने कुटुंब न्यायालयात देखभालीसाठी दावा दाखल केला होता. तपासात पोलिसांना कळाले की, बंटीला ३१ जुलै रोजी न्यायालयात १५०००० रुपये जमा करायचे होते. ही रक्कम त्याला द्यायची नव्हती. त्यामुळेच शालूचा काटा काढण्यासाठी त्याने दोन भाऊ आणि वडिलांच्या मदतीने पत्नीची हत्या केली.पोलिसांनी आरोपी बंटीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, शालू घरी चहा बनवत होती. ३१ जुलै रोजी पतीच्या भावाने आणि वडिलांनी शालूला पकडले. त्यानंतर त्याने पत्नी शालूचे डोके दगडाने ठेचले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर बंटीने सासरच्या लोकांना बोलावून सांगितले की, शालूने त्याला सोडले आहे. यानंतर तिच्या वडिलांनी रेल्वे कॉलनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jy2zcT4
No comments:
Post a Comment