Breaking

Sunday, August 6, 2023

धक्कादायक! शाळकरी मुलीजवळ प्रेमाचं सूत जुळलं; एक चुकीचं कृत्य अन् आयुष्यभराची शिक्षा, नेमकं काय घडलं? https://ift.tt/GB1cdSI

ठाणे: चिमुरडीसह अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना घडतच असतानाच, एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर १६ वर्षीय विद्यार्थांने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित शाळकरी मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील शीळ डायघर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमानुसार त्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पीडित शाळकरी मुलगी ही शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून ती एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर पोलिसांच्या ताब्यात असलेला अल्पवयीन विद्याथी हा त्याच परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर दोघात प्रेमसंबंध जुळले. नेहमीच शाळा - महाविद्यालय जाण्याच्या बहाण्याने ते दोघे एकमेकांना भेटत होते. मात्र त्या दोघांच्याही घरच्यांना त्यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. प्रेम जुळल्याने दोघे एकमेकांना भेटत असताना त्या अल्पवयीन विद्यार्थाकडून पीडित करण्यात आला. मात्र यामुळे काय घडेल त्याची कल्पना दोघांना नव्हती. त्यातच अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले. त्यानंतर पीडित मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिच्यावर घडलेला प्रसंग सांगताच तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. दरम्यान पीडित शाळकरी मुलीच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी त्या अल्पवयीन विद्यार्थांवर अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी करत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UVdmKaZ

No comments:

Post a Comment