नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये महिला डॉक्टरचा आंघोळ करतानाचा अश्लिल व्हिडिओ बनवण्याचे प्रकरण शांत होत नाही तोच दुसरीकडे मेडिकलमध्ये पुन्हा एकदा लैंगिक शोषणाची तक्रार समोर आली आहे. मनोविकृतीशास्त्र विभागाच्या एका महिला डॉक्टरने मनोविकृतीशास्त्र विभागाच्या वरिष्ठ डॉक्टराविरुद्ध लैंगिक छळाची लेखी तक्रार अधिकाऱ्यांकडे दाखल केली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी ही तक्रार गांभीर्याने घेत चौकशी समिती नेमण्यात आली आहे.मेडिकलच्या मानसोपचार मनोविकृतीशास्त्र विभागात एक महिला डॉक्टर हाऊस ऑफिसर म्हणून सहा महिन्यांच्या करारावर कार्यरत आहे. महिला डॉक्टर मंगळवारी अधिष्ठाता कार्यालयात पोहोचली आणि तिच्याच विभागातील वरिष्ठ डॉक्टरांविरुद्ध लैंगिक छळाची तोंडी तक्रार केली. मेडिकल चे अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी महिला डॉक्टराला लेखी तक्रार देण्यास सांगितले. लेखी तक्रार मिळताच डॉ. गजभिये यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने तपास सुरू केला आहे. शुक्रवारी समितीने विभागप्रमुखांसह इतर डॉक्टर आणि तक्रारदारांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे जबाब नोंदवले. समितीने सर्व विषयांवर चर्चा केली. महिला डॉक्टरांच्या तक्रारीतील तथ्यही तपासण्यात आले. आता ही समिती आपला अहवाल अधिकाऱ्यां कडे सादर करुन पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ डॉक्टर महिला डॉक्टरला शेरेबाजी करत होते. विनाकारण त्यांचा केबिनमध्ये बसवून ठेवले जात होते. यापूर्वीही त्यांनी काही महिला निवासी डॉक्टरांवर असाच प्रकार केला होता.तक्रारदार महिलेला सौम्य मानसिक आजार असल्याचेही बोलले जात आहे.विभागातील काही वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी यापूर्वीही छळवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C3BJ1qa
No comments:
Post a Comment