मुंबई : भारतीय संघात सध्याच्या घडीला मोठे प्रयोग सुरु आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही आजी-माजी खेळाडूंना संघाबाहेर करण्याचा प्रयोग मात्र चांगलाच फसला आहे. पण हा प्रयोग नेमका का फसला, हा प्रयोग करण्यामागे नेमकं काय कारण होतं, या गोष्टींचा उहापोह भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने केला आहे."मला असं वाटतं की, भारतीय संघाच्या थिंक टँकने विराट आणि रोहित यांना विश्रांती देण्याचा जो निर्णय घेतला होता, तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला नाही. त्यासाठी कारणंही तसेच आहे. कारण युवा खेळाडूंना ाता ही संधी दिली आहे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ५० षटकांचा खएळ पाहिले तर त्यामध्ये गिअर कसे बदलायचे, हे महत्वाचे असते. जेव्हा ते आपल्या फलंदाजीला परिस्थितीनुसार योग्य वेग देतील तेव्हा त्यांना ५० षटके खेळता येतील आणि ५० षटके खेळले तर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. पण माझ्यामते तीच गोष्ट आपल्या संघाकडून घडताना दिसत नाही. कारण तुम्ही जर पहिला वनडे सामान पाहिलात, त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्यासाठी ११५ धावांची गरज होती. पण या ११५ धावा करण्यासाठी भारताला ५ विकेट्स गमवावे लागले होते. माझ्यामते या गोष्टीवर लवकरात लवकर विचार करण्याची गरज आहे. जर एखाद्या महत्वाच्या सामन्यात संघातील वरिष्ठ खेळाडू बाद झाले, तर युवा खेळाडूंनी काय करायचे, हे महत्वाचे आहे. कारण आतापर्यंत महत्वाच्या सामन्यांत जेव्हा आपण दिग्गज फलंदाजांना लवकर गमावले तेव्हा भारताला सामान जिंकता आला नाही किंवा मोठी धावसंख्या ुभारता आली नाही, त्यामुळे या गोष्टीवर सध्याच्या घडीला विचार करायला हवा असे मला वाटते, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू प्रग्यान ओझाने व्यक्त केले आहे. प्रग्यान हा सध्याच्या घडीला जिओ सिनेमावर क्रिकेट तज्ञ म्हणून काम पाहत आहे. प्रग्यान ओझाने यावेळी भारतीय संघातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4cnhy1S
No comments:
Post a Comment