: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ज्यांच्यावर गेले अनेक दिवस टीका होत असलेले आण त्या बद्दल गुन्हा दाखल झालेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक यांच्या गाजलेल्या विदर्भ दौऱ्यानंतर ते सांगलीमध्ये आज सायंकाळी दाखल झाले. संभाजी भिडे हे सांगलीतील त्यांच्या गावभागातील निवासस्थानी येताच शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी करत, भिडेंवर फुलांची उधळ करत महिलांनी यावेळी औक्षण केले. यावेळी धारकऱ्यांनी भारत माता कि जयच्या जोरदार घोषणा दिल्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे हे विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, श्री साई बाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली होती. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर संतप्त पडसाद उमटले होते. काँग्रेससह पुरोगामी संघटनांनी गुन्हा दखल करण्याची मागणी करत आंदोलने केली होती. भिडे यांच्या विरोधात ठाणे आणि अमरावती मध्ये गुन्हे दाखल झाले. त्यानंतरही भिडे यांनी आपला दौरा यशस्वी केला. आज मंगळवारी भिडे हे विदर्भ दौरा संपवून सांगली मध्ये सायंकाळी दाखल झाले. शहरातील गावभाग परिसरात असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानासमोर धारकऱ्यांनी भिडेंच्या स्वागताची मोठी तयारी केली होती. भिडेचें आगमन होताच धारकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली. भिडेंवर फुलांची उधळण करत महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/guhnCX9
No comments:
Post a Comment