Breaking

Monday, August 7, 2023

कर्मचाऱ्याचा कामादरम्यान मृत्यू, नामांकित कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप, परिसरात तणाव https://ift.tt/MkvWahy

सातारा : येथील एका नामांकित कंपनीतील कर्मचाऱ्याचा कामादरम्यान प्रकृती ढासळल्यानंतर काही तासांतच आकस्मित मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक व गावकरी कंपनीसमोर एकत्र आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले की, शिरवळ येथील एका नामांकित कंपनीमधील कामगार सुनिल मारुती भिसे (वय ३८, रा. पळशी) हे आज कंपनीत कामावर गेले असताना कामादरम्यान त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना कंपनीच्या वाहनाने तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टर नसल्याने त्यांना त्यांच्या राहत्या घरी सोडण्यात आले. त्यानंतर भिसे यांना अधिक त्रास झाल्याने त्यांना पळशी ग्रामस्थांनी उपचारासाठी शिरवळ येथे आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घडलेल्या प्रकारानंतर पळशी ग्रामस्थ व मृताचे नातेवाईक यांनी कंपनी परिसरामध्ये एकत्र आले. कंपनीने कामगारास उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने हलगर्जीपणा दाखवत डॉक्टर नसल्याचे कारण देत इतरत्र उपचारासाठी नेण्याऐवजी घरी नेवून सोडले. कंपनीने आपली जबाबदारी झटकल्याने संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी मागणी करत गेटसमोर गर्दी केली. मात्र, पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, अब्दुल हादी बिद्री व कर्मचारी तात्काळ हजर झाल्याने शांततेत परिस्थिती हाताळली गेल्याने मोठा अनर्थ टळला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/InEOtQA

No comments:

Post a Comment