मुंबई: ख्यातनाम कलादिग्दर्शक यांच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टी सुन्न झाली आहे. भव्यदिव्य सेट्सच्या उभारणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देसाईंनी बुधवारी (२ एप्रिल) जीवनप्रवास संपवला. दिल्लीहून परतलेल्या देसाईंनी कर्जमधला गाठला. तिथ त्यांनी गळफास घेत जीवनप्रवास संपवला. एन डी स्टुडिओ हा देसाईंचा ड्रिम प्रोजेक्ट होता. मात्र याच स्टुडिओवर कर्जामुळे जप्तीची टांगती तलवार होती. त्यामुळे देसाई अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. अखेर त्यांनी एन डी स्टुडिओमध्येच आयुष्याता शेवट केला.नितीन देसाई काही दिवसांपूर्वीच दिल्लीला गेले होते. तिथून ते विमानानं मुंबईत परतले. त्यानंतर त्यांनी एन डी स्टुडिओ गाठला आणि टोकाचं पाऊल उचललं. आता नितीन देसाईंच्या आत्महत्येबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देसाईंनी एन डी स्टुडिओसाठी कोट्यावधींचं कर्ज घेतलं होतं. मात्र गेल्या महिन्यांपासून एन डी स्टुडिओमध्ये फारशी कामं सुरू नव्हती. इथे चित्रित होणाऱ्या चित्रपट आणि मालिकांची संख्या रोडावली. त्यामुळे देसाईंसमोरील आर्थिक समस्या वाढत गेल्या. स्टुडिओवर जप्तीची टांगती तलवार होती. स्टुडिओचा लिलाव टाळण्यासाठी देसाईंनी याचिका दाखल केली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे लिलावाची कारवाई अटळ मानली जात होती. याच कारणामुळे देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं. १ ऑगस्टला नितीन देसाई दिल्लीला गेले होते. दिल्ली नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) कोर्टाच्या बेंचकडे त्यांनी अपील केलं होतं. मुंबई एनसीएलटी कोर्टानं दिलेल्या कायदेशीर कारवाईच्या आदेशाविरोधात देसाईंकडून याचिका दाखल करण्यात आली होती. दिल्ली एनसीएलटीकडून कारवाईला स्थगिती मिळेल, अशी अपेक्षा देसाईंना होती. मात्र दिल्ली एनसीएलटीनं मुंबई कोर्टाचा आदेश कायम ठेवला आणि देसाईंचं अपील फेटाळलं. त्यामुळे देसाईंना धक्का बसला. स्टुडिओ वाचवण्यासाठी देसाईंची धडपड सुरू होती. मात्र दिल्लीतील निर्णयानं स्टुडिओचा लिलाव होण्याची शक्यता वाढली. देसाई १ ऑगस्टलाच रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईत आले. त्यांनी कर्जत गाठलं आणि स्टुडिओत गळफास लावून घेतला. नितीन देसाईंनी एका फायनान्स कंपनीकडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. व्याजासह कर्जाचा आकडा २५० कोटी रुपयांवर पोहोचला. एडलवाईस कंपनी कर्जाच्या वसुलीसाठी सातत्यानं प्रयत्न करत होती. कंपनीनं कर्जवसुलीसाठी एनसीएलटी कोर्टात धाव घेतली. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निकालाची प्रत सोपवण्यात आली होती. 'कर्ज घेताना नितीन देसाईंनी एन डी स्टुडिओची जमीन तारण ठेवली होती. त्यामुळे ही जमीन ताब्यात घेऊन कर्जाची वसुली करण्यात यावी,' असे आदेश निकालात देण्यात आले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ajqukFA
No comments:
Post a Comment