Breaking

Sunday, August 20, 2023

मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला स्थगिती; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले- नाईट लाईफ गँगच्या... https://ift.tt/vJNrUkn

रत्नागिरी: कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई विद्यापीठाची निवडणुकीवरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ते अपयशी आहेत, याचच त्यांना टेन्शन आलं आहे आणि म्हणूनच ते अशा नकला करत काहीही बोलत आहेत, अशा शब्दात नितेश राणे यांनी सुनावले आहे. संजय राऊत म्हणाले होते की, भाजप डरपोक आहे. निवडणुका घेण्यास घाबरतात. त्यावर नितेश राणे म्हणाले की, कोण डरपोक आहेत हे येत्या काळात कळेल. पाटकरांच्या तपासात मातोश्रीवर बसून फोन करणाऱ्यांची चौकशी करीन. युवासेनेवर टीका करत नाईट लाईफ गँगच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना सिनेटची निवडणूक घ्यायची आहे, असा मोठा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. एकीकडे ते विद्यार्थी हित दाखवायचे तर दुसरीकडे विद्यार्थी नाईट लाइफ टोळ्यांच्या शिकार होत आहेत. डरपोक व्याख्या काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू.कोविड काळात मुंबईत राहणाऱ्या कामगारांना इतर राज्यात पाठवण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात आले. मजुरांना खाण्यासाठी जी खिचडी होती त्यातही भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. ज्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्षे हिंदुत्वाचा आवाज बुलंद करायचे, आज त्याच मातोश्रीवरून ते काँग्रेस नेत्यांसोबत सहली तयार करायचे काम करतात. ज्या मातोश्रीवर तुम्ही काँग्रेस नेत्यांसोबत बसता, तिथे गोमूत्र शिंपडणार का? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या किंवा आपण सेक्युलर झालो आहोत, राजकीय धर्मांतर झाला आहे, असं सांगून टाका, अशी जहरी टीका नितेश राणेंनी केली आहे. सुजित पाटकरांशी तुमचा काय संबंध? खासदार संजय राऊत नशेत बोलतात का? त्यांना माहीत आहे आज ना उद्या त्यांना सुजित पाटकरांसोबत तुरुंगात जावे लागेल. म्हणूनच ते सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे भाजपसोबत येण्यास तयार आहेत. याआधी तशा दोन भेटी झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. ते पुढे म्हणाले की, आगामी काळात विखे पाटील विजयी होणार आहेत. ते खासदार होणार हे नक्की आहे. आमचे सगळेच खासदार पुन्हा एकदा केंद्रात जातील. भरत गोगावले शिंदे गटात काय चालले आहे. याची फारशी माहिती आमच्याकडे नाही. ते कोणत्या संदर्भ संपर्कातून असं बोलले हे आपल्याला माहिती नाही. हिंदुत्वाच्या नावाने आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. राणे म्हणाले की, नवाब मलिक दोनच महिन्यांसाठी बाहेर आले आहेत. ते वैद्यकीय कारणास्तव बाहेर आले आहेत. याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. ते मंत्री होतील की परत येतील असे वाटत नाही. नवाब मलिक यांच्या कोणी भेटी घेतल्या म्हणजे ते मंत्री होतील, असं मला वाटत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. तसेच राज ठाकरे हे स्पष्टवक्ते नेते आहेत. त्यांना काही चुकत असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पक्ष वाढवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते, असे नितेश राणे यांनी सांगितले. शरद पवार आज नाही तर उद्या आमच्यासोबत येतील. शरद पवार यांचे शरीर महाविकास आघाडीमध्ये असेल, पण त्यांचे ह्रदय महायुतीत आहे, असे ते म्हणाले आहेत. नितेश राणे पुढे म्हणाले की, भास्कर जाधव हा एक अपयशी माणूस आहे. भास्कर जाधव, विनायक राऊत, नारायण राणे हे एका वेळेला शिवसेनेत कार्यरत होते. सामान्य शिवसैनिकापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत राणे साहेब गेले. त्यांनी एका मुलाला खासदार केलं. एका मुलाला दोन वेळा आमदार केलं आणि हीच चीड भास्कर जाधव यांना आहे. भास्कर जाधव अजून राज्यमंत्री पदापेक्षा पुढे जाऊ शकले नाहीत. मुलाचेही भवितव्य फार घडवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना हे अपयशाचं नैराश्य आले आहे. म्हणून भास्कर जाधव अशा नकला करत टीका करत आहेत, असा जाधव यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9xXcwYM

No comments:

Post a Comment