Breaking

Wednesday, August 2, 2023

चहा बनवायला उशीर झाला, त्याच्यातला राक्षस जागा झाला, पत्नीसोबत जे केलं ते पाहून पोलिसही हादरले https://ift.tt/WsMgqUm

लखनऊ: एका व्यक्तीने क्षुल्लक कारणावरुन पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली आहे. चहा बनवण्यावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे बायकोने चहा करायला थोडा उशीर केला. याचा राग आल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला.पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात महिलेच्या गळ्याभोवती बोटांच्या खुणा आणि अंगावरील जखमेच्या खुणावरून हे हत्येचं प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. शहरातील विश्व विद्यालय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थाटीपूर गावात ही घटना घडली आहे. २२ वर्षीय साधना रजकचा तिचा पती मोहित रजक याने गळा आवळून खून केला होता. बायकोने चहा करायला उशीर केला होता. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले होते.चहावरून दोघांमध्ये वाद मोहितने आधी पत्नीला बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. सुरुवातीला सासरच्या लोकांनी साधना यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी मोहितची कडक चौकशी केली असता त्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, दोघांचे २०२१ साली लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. नंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडणे सुरू झाली.पत्नीची हत्या केल्याने पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TcdPaeR

No comments:

Post a Comment