Breaking

Tuesday, August 8, 2023

Mumbai News: मुंबईत आजारांचा ताप वाढला, विवध प्रकारचे आजार फोफावले; शहरातील रुग्णसंख्या धक्कादायक https://ift.tt/9xBn4gE

मुंबई : मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रो या आजारांचा ताप दिवसेंदिवस वाढत असून एक ते सहा ऑगस्ट या कालावधीमध्येही या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. मलेरियाचे २२६, डेंग्यूचे १५७ रुग्ण या सहा दिवसांत आढळून आले. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भावही वाढता आहे. या आठवड्यात या आजाराच्या ५६ रुग्णांची नोंद झाली.मुंबईतील रुग्णसंख्याआजार १ ते ६ ऑगस्टदरम्यान जुलैमलेरिया - २२६-७२१लेप्टो - ७५- ४१३डेंग्यू - १५७- ६८५गॅस्ट्रो- २०३- १७६७कावीळ - ६- १४४चिकुनगुनिया- ९- २७स्वाइन फ्लू - ५६- १०६डास मारण्यासाठी केलेली ‘फॉगिंग’ कार्यवाहीवापरलेल्या फिलिंग मशिनची संख्या - ६,५६५धूरफवारणी झालेल्या इमारतींच्या परिसरांची एकूण संख्या - २०,७२९धूरफवारणी झालेल्या झोपड्यांची संख्या - २,५३,१२४डेंग्यू नियंत्रणतपासणी केलेली घरे - ३,५२,४१६तपासणी केलेले कंटेनर - ३,७४,३२७एडिस डासांच्या उत्पत्तीची स्थाने - ५,११५लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी सूचनासाचलेल्या पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार ७२ तासांच्या आत रोगप्रतिबंधक उपचार घ्यावेपूर किंवा मुसळधार पावसानंतर साचलेल्या पाण्यात जाऊ नये. मुसळधार पावसात अनवाणी चालू नयेपालिकेची आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uCgtk0N

No comments:

Post a Comment