Breaking

Tuesday, August 8, 2023

शिक्षणाच्या माहेरघरात खळबळ, डीनने प्रवेशासाठी १६ लाखांची लाच मागितली अन् जाळ्यात अडकला https://ift.tt/x2hts58

पुणे : महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डीन (५४, पद – अधिष्ठाता) यांना १६ लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपयांची घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आज सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार डॉक्टर यांचा मुलगा NEET परिक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी २२ लाख ५० हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी १६ लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते. तक्ररदार डॉक्टर यांच्या मुलाचा पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिटयुशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे आशिष बनगिनवार (डिन) यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. डीनने लाच मागिल्यानंतर तक्रारदार यांनी यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आशिष बनगिनवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रूपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपये बनगिनवार यांनी त्यांच्याच कार्यालयात घेतले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले आहे.ही कारवाई पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zBSQKL7

No comments:

Post a Comment