ठाणे : ५ दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले होते. या दरम्यान ठाण्यातील कळवा येथील एक ३७ वर्षीय व्यक्ती आपल्या साथीदारांच्या सोबत नाल्यात करण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना गुरुवारी २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर बचाव पथकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे सदर मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला अडथळे प्राप्त होत होते त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. गेल्या ५ दिवसांपासून सदर व्यक्तीचा शोध सुरु होता. अखेर ५ दिवसांनंतर वाहून गेलेल्या रमेश लिंगप्पा टेकी उर्फ दोसा याचा मृतदेह कळवा साकेत ब्रिज जवळ नाल्यात सापडला आहे.ठाण्यातील कळवा येथील खारेगाव स्मशानभूमीच्या समोर साकेत ब्रिज जवळ असलेल्या नाल्यात मंगळवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका ३५ ते ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या बाबत माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सदरचा मृतदेह बाहेर काढला. मात्र सदर मृतदेह हा पाण्यात कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटली नाही. सदरचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला. कळवा पोलिसांनी सदर व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठविला होता. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. कळवा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून खात्री केली असता सदरचा मृतदेह हा ५ दिवसांपूर्वी रेतीबंदर खाडी किनारी असणाऱ्या नाल्यामध्ये मासेमारी करण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेलेला रमेश लिंगप्पा टेकी उर्फ दोसा याचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6Q7uVOx
No comments:
Post a Comment