Breaking

Tuesday, August 1, 2023

दणदणीत विजयासह भारताने वनडे मालिका जिंकली, वेस्ट इंडिजचे १७ वर्षांनंतरही विजयाचे स्वप्न अधुरे https://ift.tt/lYU7XPx

तौराबा : भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर २०० धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५१ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या डावासारखा गडगडला आणि त्यांचे १७ वर्षांपासूनचे मालिका विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. कारण वेस्ट इंडिजने यापूर्वी भारताविरुद्ध वनडे मालिका ही २०६ साली जिंकली होती. या सामन्यापूर्वी दोन्ही संघा १-१ अशा बरोबरीत होते. त्यामुळे वेस्ट इंडिजला यावेळी इतिहास रचण्याची संधी होती. पण तिसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि त्यांचे १७ वर्षांपासूनचे वनडे मालिका विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.भाराताच्या ३५२ धावांंच्या आव्हान पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ उतरला खरा, पण त्यांना एकामागून एक तीन धक्के दिले ते मुकेश कुमारने. पहिल्याच षटकात मुकेशने वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंगला बाद केले आणि वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. किंगला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मुकेशने कायले मेयर्ससारख्या धडाकेबाज फलंदाजाला फक्त चार धावांवर बाद केले. त्यानंतर भारताला सर्वात मोठे यश मिळवून दिले ते कर्णधार शाय होपच्या रुपात. कारण होपने गेल्या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली होती आणि संघाला सामना जिंकवून दिला होता. पण यावेली मुकेशने त्याला पाच धावांवर बाद केले आणि तिथून भारताला विजयाचा मार्ग सापडल्याचे पाहायला मिळाले. कारण होप बाद झाला आणि हा सामान भारताच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या अलिक अथानझे याने ३२ धावा करत थोडा फार झुंज दिली खरी, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले होते.भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ८५ धावा केल्या. इशान किशनने यावेळी सलग तिसरे अर्धशतक झळकावले. इशानने या सामन्यात ७७ धावांची दमदार खेळी साकारली. संजू सॅमसनने या सामन्यात संधीचे सोने केले. संजूने ४१ चेंडूंत ५१ धावांची तुफानी खेळी साकारली. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही या सामन्यात अर्धशतक झळकावले. हार्दिकने ५२ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७० धावांची खेळी साकारली. हार्दिकच्या या खेळीच्या जोरावर भारताला ३५० धावांचा पल्ला ओलांडता आला. सूर्या मात्र अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला, त्याला ३५ धावा करता आल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IbYK4h8

No comments:

Post a Comment