Breaking

Thursday, August 10, 2023

बोअरमध्ये पडलेला चिमुकला सुखरुप, सहा तास चालले बचावकार्य; थरारक Video https://ift.tt/0n6XK8a

परभणी : मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील बालक सोहम उर्फ गोलू सुरेश उक्कलकर हा चार वर्षीय मुलगा शेतातील पडिक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या विविध पथकांनी पाच ते सहा तास युद्धपातळीवर केलेल्या बचावकार्यामुळे बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.सोहम आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. खेळत खेळत तो जवळच्या बोअरमध्ये पडला. त्यामध्ये वीस फूट अंतरावर अडकला असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओहळ, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार मंडल अधिकारी यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. तीन जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सहा तासांनंतर सोहमला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही बातमी सर्वत्र पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GMfSHvF

No comments:

Post a Comment