म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजांची पोळा सणानिमित्त बुधवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी खांदेशेकणी केली.शेतकऱ्यांनी बुधवारी बैलांना कामाला जुंपले नाही. दुपारी नदीवर नेऊन बैलांना आंघोळ घातली. सायंकाळी पळसाच्या पानाने तुप, हळद लावून बैलांचे खांदे शेकले. त्यानंतर घरच्या लक्ष्मीने बैलांची पूजा करून त्यांना पोळ्यानिमित्त पुरणपोळी जेवणाचे आवतन दिले.सततचा दुष्काळ आणि यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा करण्यासाठी तयारी केली आहे. महागाईचा फटका पोळा सणालाही बसला आहे. बैलांना सजविण्यासाठी झूल, मोरकीसह सर्वच वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काही न घेता आपल्या सर्जाराज्यांना सजविण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. कितीही अडचण आली तरी आम्ही पोळा सण साजरा करतो, असे आर्णी तालुक्यातील दाभडी येथील शेतकरी बाळासाहेब डिके यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pORZjFK
No comments:
Post a Comment