Breaking

Tuesday, September 12, 2023

देशातील ४० टक्के खासदारांवर गुन्हे, केरळमधील नेते आघाडीवर, महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या https://ift.tt/y2F9Vxm

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशातील ४० टक्के विद्यमान खासदारांवर गुन्हे दाखल असून, त्यातील २५ टक्के खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. खासदारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतून 'द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने मिळवलेल्या माहितीत या नोंदी आढळल्या आहेत.कोणावर किती गुन्हे?- लोकसभा व राज्यसभेतील एकूण ७७६ लोकप्रतिनिधींपैकी ७६३ लोकप्रतिनिधींच्या प्रतिज्ञापत्रांतील माहितीच्या आधारे 'एडीआर' व 'नॅशनल इलेक्शन वॉच' या संस्थांनी ही आकडेवारी दिली आहे.- यातील ४० टक्के विद्यमान खासदारांवर गुन्हे दाखल. त्यापैकी २५ टक्के खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, अपहरण व अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे या अहवालातून स्पष्ट.- केरळमधील २९पैकी २३ खासदारांवर गुन्हे दाखल. यामध्ये लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचा समावेश.- बिहारमधील ५६पैकी ४१, महाराष्ट्रातील ६५पैकी ३७, तेलंगणातील २४पैकी १३, दिल्लीतील १०पैकी पाच खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात दोन्ही सभागृहांतील खासदारांचा समावेश आहे.- भाजपच्या एकूण ३८५ खासदारांपैकी १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे, तर काँग्रेसच्या ८१ खासदारांपैकी ४३ खासदारांविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत.- अन्य पक्षांमध्ये तृणमूल ३६पैकी १४, राष्ट्रीय जनता दल सहापैकी पाच, 'माकप' आठपैकी सहा, आम आदमी पक्ष ११पैकी तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठपैकी तीन याप्रकारे गुन्ह्यांची नोंद आहे.- सुमारे ११ विद्यमान खासदारांवर हत्येप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, तर ३२ खासदारांविरोधात हत्येचा प्रयत्न करणे या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे.- महिलांच्या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद झालेल्या खासदारांची संख्या २१ आहे. यापैकी चार खासदारांविरोधात बलात्काराचा आरोप आहे.कोण, किती श्रीमंत?- लोकसभा व राज्यसभेतील खासदारांची सरासरी मालमत्ता ~ ३८.८३ कोटी, तर एकूण ५३ खासदार अब्जाधीश असल्याची नोंद.- सर्वाधिक श्रीमंत खासदार तेलंगणमधील आहेत. या खासदारांची सरासरी मालमत्ता ~ २६२.२६ कोटी आहे.- यानंतर आंध्र प्रदेश (~ १५०.७६ कोटी) आणि पंजाब (~ ८८.९४ कोटी) यांचा क्रमांक येतो.- लक्षद्वीपच्या एकमेव खासदाराची मालमत्ता सर्वांत कमी, म्हणजे ~ ९.३८ लाख आहे. त्रिपुरा व मणिपूर (प्रत्येकी तीन खासदार) येथील खासदारांची सरासरी मालमत्ता अनुक्रमे ~ १.०९ कोटी व ~ १.१२ कोटी आहे.- भाजपच्या खासदारांची सरासरी मालमत्ता ~ १८.३१ कोटी, तर काँग्रेसच्या खासदारांची सरासरी मालमत्ता ~ ३९.१२ कोटी आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RWrH01Y

No comments:

Post a Comment