Breaking

Saturday, September 9, 2023

G20 Summit: दिल्लीतील गरीब व प्राणी दिसू नयेत याचा खटाटोप; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल https://ift.tt/rpF6VLW

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून दिल्लीतील गरीब लोक व प्राणी दिसू नयेत याची तजवीज केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. दिल्लीमधील झोपडपट्ट्या झाकून टाकल्या किंवा पाडल्या जात असून भटक्या प्राण्यांना पकडून नेले जात आहे असे सांगून आमच्या पाहुण्यांपासून भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.काँग्रेसने त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून दिल्लीमधील झोपड्या झाकल्या जात असल्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबत काही कुत्र्यांचे व्हिडीओही शेअर केले असून ‘कुत्र्यांना मानेला धरून ओढले जात आहे, काठीने मारून पिंजऱ्यात टाकले जात आहे. त्यांना अन्न आणि पाणी नाकारले जात आहे, त्यांना भीती दाखवली जात आहे,’ असे त्यात म्हटले आहे.काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही याप्रकरणी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांची प्रतिमा उजळवण्यासाठी दिल्लीमध्ये झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्यामुळे हजारो बेघर झाले. भटक्या प्राण्यांना क्रूरपणे पकडले गेले, असे त्यांनी म्हटले आहे.दिल्ली प्रशासनाकडून इन्कारदिल्ली महानगरपालिकेने मात्र कुत्र्यांना क्रूर पद्धतीने उचलले गेल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचे खंडन केले असून ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रस्त्यांवरून उचललेल्या कुत्र्यांची योग्य काळजी घेण्यात आली आहे आणि कसलेही क्रूर वर्तन किंवा इजा झालेली नाही. कुत्र्यांना ‘तातडीच्या गरजेनुसार’ उचलले जाते आणि त्यांना वैद्यकीय आणि इतर काळजी घेऊन योग्य सुविधा दिल्या जातात, असे यात म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jgta6V4

No comments:

Post a Comment