Breaking

Saturday, September 9, 2023

इथे ओशाळली माणुसकी! महिलेला प्रसूती कळा सुरू; पोलिसांनी रुग्णालयात नेले, डॉक्टरांचा उपचारास नकार, अन्... https://ift.tt/LjckzEy

ठाणे: कल्याणच्या स्कायवॉकवर मोलमजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला पोटात दुखत असल्याचा कॉल महात्मा फुले पोलिसांना आला. त्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्कायवॉकवर धाव घेत या महिलेचा शोध घेतला. वेदनेने विव्हळत असलेली ही महिला पोलिसांच्या दृष्टीस पडली. पोलिसांनी इतर महिलांना मदतीसाठी पाचारण करत दिलावर यांना तातडीने स्ट्रेचर आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस मित्र दिलावर सहकार्यासमवेत स्कायवॉकवर येत या सर्वांनी मिळून महिलेला प्रसूतीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. मात्र ड्युटीवरील डॉक्टरांकडून तिला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. रुग्णालयात दाखल असलेल्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांनीही अनेक वेळा विनंती केली. रुग्णालयाच्या कर्मचारी आणि डॉक्टरांनी पोलिसांबरोबर आरेरावीची भाषा केली. रुग्णाला इथून घेऊन जा, असे उद्धट बोलण्यात आले. यादरम्यान या महिलेची जवळपास प्रसूती होत आल्याने अखेर महिलांनीच रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावर या महिलेची प्रसूती केली. अखेर याबाबत वरिष्ठ पोलिसांनी रुग्णालयातील वरिष्ठांना कळविल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला आत नेत बाळाची नाळ कापत या महिलेसह बाळाला वायले नगर येथील प्रसूती केंद्रात पाठवले आहे. मात्र या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YFR6AKe

No comments:

Post a Comment