Breaking

Sunday, September 24, 2023

कामाच्या शोधात मध्यप्रदेशातून पुण्यात, भरधाव वेगातील कारने ५ मजुरांना चिरडले, तिघांचा मृत्यू https://ift.tt/3kuMfCA

पुणे : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडले आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपाचरा दरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून ते कामाला आले होते, अशी माहिती समोर आली आहे.जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे असून रविवारी रात्री साधारण आठ ते सव्वा आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नगर - कल्याण महामार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच डीगोरे परिसरात पाच शेत मजूर मध्यप्रदेश येथून आले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी क्र. एम एच १२ व्ही क्यू ८९०९ ही भरधाव वेगात होती. त्या गाडीने या पाच मजुरांना चिरडले. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई करत अपघातस्थळी पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करत आहेत. गेल्या चार-पाच दिवसात नगर - कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. प्रशासनाने गावागावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pM1vSrA

No comments:

Post a Comment