म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: चाकूचा धाक दाखवून विक्रम अथवाल हा पवईतील हवाई सुंदरी रूपल ओगरे हिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. ती प्रतिकार करीत असतानाच त्याला चाकू लागला आणि त्यातूनच त्याने गळा चिरल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, अटक आरोपी विक्रमला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.छत्तीसगडची रूपल ही पवईमध्ये बहिणीसोबत वास्तव्यास होती. रविवारी सकाळी ती एकटीच असताना विक्रम सोबत नऊ इंचाचा चाकू घेऊन तिच्या घरात गेला. आतमध्ये जाताच त्याने दरवाजा बंद केला. त्याचवेळी रूपलला संशय आला. मात्र ती काही करण्याआधीच विक्रमने चाकूचा धाक दाखवत लगट करण्याचा प्रयत्न केला. रूपलने त्याला विरोध केला आणि झटापटीत विक्रमला चाकू लागला. यामुळे संतापून त्याने रूपलचा गळा चिरल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने काही तासांत या हत्येचा छडा लावला आणि विक्रमला अटक केली. कधी जुन्या भांडणाच्या रागातून तिची हत्या केल्याचे तर कधी दुसरेच कारण विक्रम सांगत असल्याने तिने केलेला प्रतिकार हेच हत्येमागील कारण असल्याचे म्हटले जात आहे. विक्रमला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QpTwEPy
No comments:
Post a Comment