Breaking

Thursday, September 14, 2023

पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची परफेक्ट सोय; खड्डे बुजवण्याचे पालिकेचे दावे फोल, रस्त्यांची अक्षरश: चाळण https://ift.tt/fAPiObh

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विविध योजनांसाठीचे खोदकाम आणि रस्त्यांची डागडुजी वेळेत न झाल्याने यंदा कमी पाऊस होऊनही शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या मलमपट्टीमुळे खड्डे बुजणे तर दूरच; पण रस्तेही समपातळीवर राहात नाहीत. रस्त्यांचे संपूर्ण पुनर्डांबरीकरण पावसाळ्यानंतरच केले जाणार असल्याने तोपर्यंत खड्ड्यांतून वाहने चालवून पुणेकरांचे कंबरडे मात्र मोडणार आहे.खड्डे बुजविण्यासाठी पथ विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. खड्ड्यांची माहिती कळविण्यासाठी पालिकेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला. या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींपैकी बहुतांश खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा शहरात फिरल्यानंतर फोल ठरल्याचे दिसून येते. आदर पूनावाला यांच्यातर्फे ‘सीएसआर’ अंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील खड्डे बुजवून दिले जातात. या कालावधीत पूनावालांनी ४,८९८ खड्डे बुजवले.एक जून ते १३ सप्टेंबरपर्यंतची कार्यवाही१५९०३.९९ चौरस मीटरमहापालिकेने केलेले डांबरीकरण.८,६६४खड्ड्यांची पालिकेला मिळाली माहिती८,१९५खड्डे दुरुस्तीची पालिकेचा दावा४६९खड्डे बुजविणे बाकी३६०चेंबरची झाकणे समपातळीतपरिसर : सिंहगड रस्ताडांबरीकरण (चौ.मी.) : ४,७३२एकूण खड्डे : ६७९दुरुस्त खड्डे : ५६०शिल्लक खड्डे : ११९चेंबर दुरुस्ती : ६९पाणी साचलेली ठिकाणे : ९परिसर : कोंढवा, येवलेवाडी, कात्रजडांबरीकरण (चौ.मी.) : २,८३५एकूण खड्डे : ५५२दुरुस्त खड्डे : ४९९शिल्लक खड्डे : ५३चेंबर दुरुस्ती : ६१पाणी साचलेली ठिकाणे : २परिसर : नगर रस्ता, खराडीडांबरीकरण (चौ.मी.) : १०३३.६८एकूण खड्डे : २९७दुरुस्त खड्डे : २७६शिल्लक खड्डे : २१चेंबर दुरुस्ती : ५२पाणी साचलेली ठिकाणे : १३परिसर : हडपसर, मुंढवाडांबरीकरण (चौ.मी.) : १७९१एकूण खड्डे : ६०७दुरुस्त खड्डे : ५६५शिल्लक खड्डे : १६चेंबर दुरुस्ती : ५८पाणी साचलेली ठिकाणे : ११परिसर : मध्यवर्ती पेठाडांबरीकरण (चौ.मी.) : ३१६७एकूण खड्डे : ७३३दुरुस्त खड्डे : ५९२शिल्लक खड्डे : १६८चेंबर दुरुस्ती : ३७पाणी साचलेली ठिकाणे : २०परिसर : कोथरूड, कर्वेनगर, वारजेडांबरीकरण (चौ.मी.) : ८१७एकूण खड्डे : ४६२दुरुस्त खड्डे : ३८२शिल्लक खड्डे : ८०चेंबर दुरुस्ती : २०पाणी साचलेली ठिकाणे : ३परिसर : औंध, बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगरडांबरीकरण (चौ.मी.) : १६१७.९एकूण खड्डे : ४३०दुरुस्त खड्डे : ४१८शिल्लक खड्डे : १२चेंबर दुरुस्ती : ४७पाणी साचलेली ठिकाणे : ६खड्डे बुजविण्याचे तंत्र- हॉटमिक्स : डांबर वितळवून त्यात खडी मिसळून रस्ता तयार केला जातो किंवा खड्डा बुजवला जातो. या कालावधीत महापालिकेने येरवडा येथे उभारलेल्या हॉटमिक्स प्लांटमधील २९,४२२.७ टन डांबर वापरण्यात आले.- कोल्डमिक्स : इमल्शन आणि खडी एकत्र करून खड्डे बुजवले जातात. विशेषत: पावसाळ्यात किंवा भर पावसात खड्डे कोल्डमिक्सद्वारे बुजवले जातात. या काळात कोल्डमिक्सच्या ४,७४९ बॅगचा वापर केला गेला.कोल्डमिक्स, हॉटमिक्स; तसेच पेव्हिंग आणि सिमेंट ब्लॉक वापरून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात येत आहेत. पावसाळ्यानंतर रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाईल. पॅकेजअंतर्गत रस्त्यांचे कामही सुरू आहे.- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभागखड्ड्यांची माहिती कळवा...- क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आढळलेल्या खड्ड्यांची माहिती पथ विभागाला देतात. याशिवाय नागरिकांना खड्ड्यांची माहिती कळवता यावी, यासाठी दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी कार्यालयीन वेळेत ०२०-२५५०१०८३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.- भरारी पथकाशी (रविवार वगळता) ९०४९२७१००३ या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. मोबाइल क्रमांकावर फोटो, व्हिडिओद्वारेही माहिती पाठवता येते.- ‘पीएमसी केअर अॅप’ आणि ‘एक्स’ हँडलद्वारेही खड्ड्यांच्या तक्रारींवर पथ विभागाकडून कार्यवाही केली जाते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WsE8Cyi

No comments:

Post a Comment