Breaking

Tuesday, September 26, 2023

ठाणे- वडाळा आगारासाठी ९०५ कोटींचे कंत्राट जाहीर, जमीन संपादनाआधीच कंत्राटदार नियुक्त https://ift.tt/UFQZopL

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नेमकी किती जमीन सरकारी व किती जमीन खासगी, हे ठरले नसताना, तसेच खासगी जमीन संपादनाची प्रक्रियाही सुरू झालेली नसताना त्या जमिनीवर मेट्रो आगार उभारणीसाठी एमएमआरडीएने कंत्राटदार नियुक्त केला आहे. ठाण्यातील मोघरपाडा येथे हे आगार उभे करण्यासाठी ९०५ कोटी रुपयांचे कंत्राट एसईडब्लू आणि व्हीएसई, यांच्या संयुक्त कंपनीला दिले आहे.कासारवडवली (ठाणे)-घाटकोपर-वडाळा या मेट्रो ४ (३२.३२ किमी) व कासारवडली-गायमुख या मेट्रो ४ अ (२.७० किमी), या उन्नत मार्गिंकामधील मेट्रो गाड्यांचे दुरुस्तीचे आगार घोडबंदर रस्त्यावरील मोघरपाडा येथे प्रस्तावित आहे. हे आगार उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने () ऑक्टोबर २०२२मध्ये निविदा काढली होती. त्यामध्ये एसईडब्लू-व्हीएसई यांची ९०५ कोटी रुपयांची संयुक्त बोली सर्वांत कमी किमतीची ठरली. या कंपनीला आगार उभारणीसाठी कंत्राटदार म्हणून नियुक्त केल्याचे प्राधिकरणाने २६ सप्टेंबरला जाहीर केले. मोघरपाडा येथील ही एकूण जमीन १७४.०१ हेक्टर इतकी आहे. अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने ही जमीन बांधकामाधीन मेट्रो ४, मेट्रो ४ असह प्रस्तावित मेट्रो ११ (वडाळा-सीएसएमटी भूमिगत) आणि मेट्रो १० (गायमुख-मिरा रोड) या मार्गिकांच्या आगारांसाठी, तसेच नियोजनस्तरावर असलेल्या ठाणे सागरी किनारामार्गासाठी एमएमआरडीएला देण्याचा निर्णय घेतला होता.'मेट्रो मार्गिकेचे स्थापत्य कामे पूर्ण होताच या मार्गिकेचा वापर लवकरात लवकर करता येण्यासाठी आगाराची उभारणी महत्त्वपूर्ण आहे. आगारासह ट्रॅकच्या कामांसाठी लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठीच दोन्ही कामांसाठी कंत्राटदारांची निवड केली असून हे काम लवकरच सुरू होईल', असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले.असे असेल आगार:एमएमआरडीएनुसार हे आगार मोघरपाडा येथील सुमारे ४२.२५ हेक्टर जागेत उभे राहणार आहे. या आगारात कारखाना, मार्गिका कार्यान्वयन नियंत्रण केंद्र, प्रशासकीय इमारत, देखभाल व कार्यशाळेच्या इमारती, साहाय्यक उपकेंद्र, कर्मचारी वसाहत, आगाराला जोडणारा पूल, भूमिगत सेवावाहिनी आदी सुविधा कंत्राटदाराला उभ्या करायच्या आहेत. आगारात ६४ रूळ असतील. त्यामध्ये ३२ सध्या वापरले जातील असे, तर ३२ रुळांची तरतूद भविष्यासाठी करण्यात आली आहे. १० निरीक्षण तळ, १० कार्यशाळा असतील. उभारणीला विलंबाची भीती:१७४.०१ हेक्टरपैकी काही जमीन ही १६७ मूळ जमीनधारकांची, तर ३१ अतिक्रमणधारकांची आहे. त्यांच्याकडून जमीन संपादित करण्यासाठी कायद्यानुसार अधिसूचना काढणे, हरकती मागविणे, मोबदल्यासंबंधीच्या कराराची प्रक्रिया, अशी मोठी प्रक्रिया असते. ही प्रक्रियाच अद्याप सुरू झाली नसल्याने खासगी विकासकांची जमीन किती व सरकारी किती, हे निश्चित झालेले नाही. यातून भविष्यात भूसंपादनापोटी आगार उभारणीला विलंब झाल्यास उभारणीचा खर्च वाढण्याची भीती असेल. तसे असताना एमएमआरडीएने कंत्राटदार मात्र नियुक्त केला आहे.मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यासाठी १२१ कोटींचे रूळ:या मार्गिकेचा पहिला टप्पा मुलुंड अग्निशमन केंद्र ते गायमुख स्थानक (१६ किमी) असेल. या टप्प्यातील स्थानके व आगाराला जोडण्यासाठी गिट्टीरहित रेल्वेरूळ बसवण्याच्या निविदेलाही एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. रेल्वेमार्गाच्या कामासाठी आरेखन (डिझाइन), उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि मार्ग सुरू करणे, या कामांसाठी मागविलेल्या निविदेत मेसर्स अपूर्वक्रिती इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची १२१ कोटी ५५ लाख ९१ हजार ३४९ रुपयांची बोली एमएमआरडीएने मंजूर करीत कंपनीला कंत्राटदार म्हणून नियुक्त केले आहे. ही रक्कम निविदेपेक्षा ७.२९ टक्के कमी असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cF1GkwV

No comments:

Post a Comment