धुळे: सध्या संपूर्ण राज्यभर गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. धुळे शहरात आज लाडक्या बाप्पाच्या मनोभावे पूजा केलेल्या गणरायाचे डीजेच्या आणि ढोल ताशाच्या गजरात विसर्जन केले जात आहे. लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यासाठी सर्वच सज्ज झाले आहे. त्यासाठी मोठी तयारीही केली गेली आहे. अशातच धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये एका चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या चौघांपैकी एका तीन वर्षीय चिमुकलीच्या पायावरून टेंपो गेल्यानी तिला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. धुळे शहरात आज सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. धुळे शहरातून निघणाऱ्या मिरवणुकी बघण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात. शहरातील जुना आग्रा रोड मार्गाने या सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्य तसेच डीजे आणि इतर वाद्यांच्या गजरात निघत असतात. हे सर्व नयनरम्य दृष पाहण्यासाठी धुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यासाठीच आज हे चारही भाविक जात असतानाच त्यांच्यावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असणाऱ्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने या भाविकांच्या अंगावर थेट टेम्पो गेला. या दुर्दैवी घटनेमध्ये चार भाविक गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमध्ये तीन वर्षीय सायली जोहरी तसेच तिची आई जस्सी जोहरी आणि पिंकी जोहरी हे तिघेही जखमी झाले आहे. या तिघांवर सध्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये सायली जोहरी या तीन वर्षीय चिमुकलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तिची आई गंभीर जखमी झाली आहे. तसेच एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरून टेंपो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. सदर घटना घडल्यानंतर टेम्पो चालकाने घटना स्थळाहून पळ काढण्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही. या प्रकरणाची पोलीस प्रशासन चौकशी करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SemEHjw
No comments:
Post a Comment