मुंबई : दहिसर-भाईंदर लिंक रोडचे काम सुरू होण्याआधीच प्रकल्पाचा खर्च दुप्पट म्हणजे चार हजार कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्पासाठी जुलैमध्ये चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली. त्यावेळी १,९९८.२२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी जीएसटी, इतर कामांसाठी तात्पुरती रक्कम आणि इतर कर मिळून हा वाढ झाली असल्याचे म्हटले आहे.पश्चिम उपनगरातून मुंबईबाहेर जाण्यासाठी तसेच वसई, विरारहून मुंबईत प्रवेश आणि घोडबंदरमार्गे ठाण्याकडे जाण्यासाठी दहीसरवरून जावे लागते. पश्चिम उपनगरातील मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसरमध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती फोडून किनारी मार्गाला (कोस्टल रोड) जोडून भाईंदरपर्यंत पोहोचण्यासाठी दहिसर-भाईंदर लिंक रोडचा पर्याय काढण्यात आला आहे. जून २०२२मध्ये या प्रकल्पाचा निर्णय झाला त्यावेळी एकूण खर्च १,६०० कोटी रुपये अंदाजित केला होता. मात्र, कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये पुन्हा निविदा मागवल्या. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २,५२७ कोटी रुपये अंदाजित करण्यात आली होती. यंदाच्या जुलैमध्ये चौथ्यांदा मागवलेल्या निविदेला अखेर अपेक्षित प्रतिसाद मिळाला. एल अँड टी कंपनीला १,९९८ कोटी रुपयांत हे कंत्राट मंजूर झाले आहे.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर खाडीजवळ उभारण्यात येणारी व्हुइंग गॅलरी, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिरोधक यंत्रणा अशा विविध आकस्मिक कामांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली असल्याचे सांगितले जाते आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, प्रकल्पाची मूळ किंमत १९५० कोटी आहे. प्रकल्पातील इतर कामांसाठी तात्पुरती रक्कम व अन्य बाबींमुळे ही वाढ झाली आहे, असे सांगितले. व्हुइंग गॅलरीचा निविदा प्रक्रियेत समावेश नसल्याचे वेलरासू यांनी स्पष्ट केले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.पालिका करणार प्रकल्पाचा खर्चया प्रकल्पातील सुमारे दीड किमी मार्ग मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत असून, साडेतीन किमी मार्ग मीरा-भाईंदर पालिकेच्या सीमेत आहे. हा प्रकल्प आधी एमएमआरडीए करणार होती. मात्र राज्य सरकारने मुंबई पालिकेकडे जबाबदारी सोपवली आहे. प्रकल्पाचा सर्व खर्च मुंबई पालिका करणार आहे.दक्षिण मुंबईतून थेट मीरा-भाईंदरया लिंक रोडमुळे गुजरात आणि ठाण्याचा मुंबईशी संपर्क वाढणार आहे. वाहतुकीची समस्या दूर होऊन प्रवाशांच्या वेळेसोबत इंधनाचीही बचत होणार आहे. लिंक रोड किनारी मार्गाला (कोस्टल रोड) जोडला जाणार असल्याने थेट दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटपर्यंत संपर्क होऊ शकेल. दक्षिण मुंबईतून थेट मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करता येणार आहे.असा असेल लिंक रोड(दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम)- एकूण लांबी : ५ किमी- रूंदी : ४५ मीटर- एकूण मार्गिका : ८- अंदाजित खर्च : ४,०२७ कोटी रुपये- देखभाल आणि दुरुस्ती खर्च : ३ वर्षे (२३ कोटी रुपये)- आंतरबदल मार्गिकांची संख्या : २- दहिसर खाडीमध्ये सुमारे १०० मीटर लांबीचा स्टीलचा पूल- संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा- एकूण ३३० खांब बनवण्यात येणार- वाहनांचा अंदाजित वापर : दररोज ७५ हजार- प्रकल्पासाठी अंदाजित कालावधी : ४२ महिने
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rviQkwH
No comments:
Post a Comment