मुंबई : मुंबईतील ध्वनीप्रदूषण वाढण्यास विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजविणारे जबाबदार आहेत. या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने दोन दिवस विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत हॉर्नमुळे सर्वाधिक आवाज चेंबूरमध्ये, तर त्यापाठोपाठ हॉर्नचा कलकलाट दादर आणि घाटकोपरमध्ये असल्याचे आढळून आले आहे. विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या चार हजारांहून अधिक वाहनचालकांना पोलिसांनी दोन दिवसांत सुमारे ४२ लाखांचा दंड ठोठावला आहे. वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्न, विनाकारण हॉर्न वाजविणे यामुळे ध्वनीप्रदूषण प्रचंड वाढते. वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करणे, कर्णकर्कश्श हॉर्न बसवणे हेही केले जाते. पोलिसांकडे अशा अनेक तक्रारी येत असून, शहराच्या ध्वनीप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आबालवृद्धांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ९ आणि १६ ऑगस्ट या दोन दिवसांत ‘नो हॉकिंग डे’ मोहिम राबवली. या कालावधीत जनजागृती करण्याबरोबरच कारवाईदेखील करण्यात आली. या कारवाईत, विनाकारण हॉर्न वाजविणारे सर्वाधिक, म्हणजे २५९ वाहनचालक चेंबूरमध्ये सापडले. त्यापाठोपाठ दादरमध्ये १९४, माहीममध्ये १८५ तर घाटकोपरमध्ये १८४ चालकांवर इ चलान कारवाई करण्यात आली.कारवाई सुरूच राहणारमोटार वाहनांचे हॉर्न आणि सायलेन्सर हे केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम क्रमांक ११९ आणि १२० मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे असावेत. गरज नसताना विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १९४ (एफ) प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच जे वाहनचालक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालवतील त्या वाहनचालकांवरदेखील कलम १९८ मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. हॉर्न आणि सायलेन्सरवरील कारवाईदिवस हॉर्न सायलेन्सर९ ऑगस्ट १९६५ १५२१६ ऑगस्ट २०८० १०९सर्वाधिक कलकलाट असणारे दहा भागपरिसर इ-चलानचेंबूर २५९दादर १९४माहीम १८५घाटकोपर १८४वांद्रे १६६दहिसर १६६भोईवाडा १६३समतानगर १६१साकीनाका १५६वरळी १४४पूर्व उपनगरांत हॉर्नचा आवाज अधिकविभाग इ चलान (१) इ चलान (२) एकूण दंडाची रक्कमपूर्व ७४२ ४६१ १२०३ १२,२६,५००मुख्यालय/मध्य ४३९ ६१९ १०५८ १०,५७,५००दक्षिण ५०० ४२१ ९२१ ०९,०१,०००पश्चिम ४४१ ५५५ ९९६ १०,२५,०००
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vwOjti8
No comments:
Post a Comment