मैनपुरी : अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयाबाहेर मरणासन्न अवस्थेत सोडून दिले. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील घिरोर भागातील एका खाजगी रुग्णालयातून अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. दुर्दैवाने तरुणीने रुग्णालयाबाहेरच प्राण सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालयाला टाळे ठोकले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राधास्वामी हॉस्पिटलचे कर्मचारी बेशुद्ध तरुणीला दुचाकीवर बसवताना दिसत आहेत. कॅमेरा दिसताच कर्मचारी लगेच आत परतताना दिसतात. गुरुवारी हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला.उपचाराअभावी मुलीचा रूग्णालयाबाहेर मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेत राधास्वामी रुग्णालयाला सील ठोकल्याचे वृत्त आहे.
पाहा व्हिडिओ :
अलिकडे उत्तर प्रदेशात वैद्यकीय निष्काळजीपणाची अशीच प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी अमेठीच्या संजय गांधी रुग्णालयात एका नवविवाहित महिलेला भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते, त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला होता.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी त्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. सखोल तपासणीत रुग्णालय प्रशासनाने गंभीर स्वरुपाचा वैद्यकीय निष्काळजीपणा बाळगल्याचे आढळून आले होते. त्यानंतर ते सील करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iLMfu1I
No comments:
Post a Comment