मोहाली: पंजाबमध्ये ट्रिपल मर्डर केसची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यसनी तरुणाने स्वतःच्या मोठ्या भावाची, वहिनीची आणि २ वर्षांच्या पुतण्याची हत्या केली आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील खरारमधून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लखविंदर सिंग असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.कौटुंबिक कलहामुळे आरोपी लखविंदर सिंगने त्याच्या मित्रासोबत तिघांची हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणाचा तपशील देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याचा मोठा भाऊ सतबीर सिंग (वय ३२), त्याची पत्नी अमनदीप कौर (वय २९) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अनहद यांची हत्या केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी आपल्या वहिनीची हत्या केली. वहिनीचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर जेव्हा भाऊ कार्यालयातून घरी आला तेव्हा त्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचाही खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह आपल्या गाडीत टाकून रोपड कालव्यात फेकून दिले. २ वर्षांच्या पुतण्याला जिवंत कालव्यात फेकलेआरोपी भाऊ २ वर्षांच्या पुतण्यालाही गाडीतून घेऊन गेला होता. त्याने पुतण्याला जिवंतच कालव्यात फेकून दिले. या घटनेला लखविंदरचा मित्र गुरदीप सिंगनेही मदत केल्याचे सांगितले जात आहे. तो सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरदीपचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.या हत्येत वापरलेले हत्यार आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर आरोपी लखबीर सिंग संगरूर जिल्ह्यातील (पंजाब) त्याच्या मूळ गावी पंधेर येथे पळून गेला होता आणि कोणालाही काही कळू नये म्हणून तो नेहमीप्रमाणे कुटुंबात राहत होता. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की १० ऑक्टोबरच्या रात्री त्याने त्याचा सहकारी गुरदीप सिंह सोबत आधी आपल्या वहिनीला मारहाण केली आणि नंतर ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर साडे दहा वाजता जेव्हा सतबीर घरी आला तेव्हा त्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला आणि मग त्याला घरात नेऊन त्याच्यावर चाकूने वार केले आणि त्याचीही हत्या केली. त्यानंतर दोघांच्या मृतदेहासह कालव्यात दोन वर्षांच्या पुतण्यालाही फेकलं आणि तेथून पळ काढला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C5x89Au
No comments:
Post a Comment