Breaking

Saturday, October 7, 2023

सायंकाळी कुटुंब घरी आलं, पोरं दिसली नाही, सगळीकडे शोधाशोध, मग पेटी उघडताच सारे हादरले https://ift.tt/94mIdob

बारमेर: खेळता-खेळता दोन लहान भाऊ-बहीण एका लोखंडी पेटीत बंद झाले आणि त्यात गुदमरल्याने त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील गद्रा रोड पोलिस स्टेशन परिसरात खेळताना ही धक्कादायक घटना घडली. रात्री कुटुंबीय शेतातून घरी परतले असता मुले न सापडल्याने ही घटना उघडकीस आली. नंतर डबा उघडून पाहिलं तर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या आई-वडिलांची अवस्था पाहून साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी आलं आहे.गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघवालांची वसाहत असलेल्या पनेला येथील चौखारामचा मुलगा रवींद्र कुमार (११) आणि मुलगी मोनिका (८) शुक्रवारी संध्याकाळी शाळेतून घरी परतले. त्यावेळी घरी कोणी नव्हते. आई-वडील शेतात कामाला गेले होते. निरागस मुले दप्तर ठेवून घरात खेळू लागली. खेळता-खेळता दोन्ही मुलं दोन दिवसांपूर्वी शेळी विकून आणलेल्या लोखंडी पेटीत शिरली आणि अचानक झाकण बंद झाल्याने दोघेही आत अडकले.दोघांनीही काही वेळ आरडाओरडा केला. मात्र, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी घरी कोणी नव्हते. सायंकाळी सहाच्या सुमारास कुटुंबीय घरी पोहोचले असता मुले घरी दिसली नाहीत. त्यांचा इकडे-तिकडे शोध घेतला, मात्र ते कुठेही सापडले नाहीत. घरात शाळेचे दप्तर पडलेले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी डब्याचे झाकण उघडले असता त्यामध्ये दोघेही दिसले. हे पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांनी लगेच दोघांना बाहेर काढले. त्यानंतर गावकऱ्यांसह त्यांनी मुलांना गदारा रोडच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते दुपारी दोनच्या सुमारास घरी परतले. दोन्ही निरागस मुले तब्बल ३ तास पेटीत अडकून राहिली. त्यानंतर त्यांचा तेथेच श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच पनेला परिसरात शोककळा पसरली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Rso7Fnx

No comments:

Post a Comment