Breaking

Sunday, October 8, 2023

मानवी पावलांचे सर्वात जुने ठसे सापडले, पुरातत्वशास्त्रज्ञांना शॉक, धक्कादायक माहिती उघड https://ift.tt/94mIdob

वॉशिंग्टन: अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यात सर्वात जुने मानवी पावलांचे ठसे सापडले आहेत, हे येथील व्हाईट सँड्स नॅशनल पार्कमध्ये सापडले आहेत. एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की सापडलेल्या पॅलेओ-मानवी पायाचे ठसे २३००० ते २१००० वर्षे जुने आहेत, ज्यामुळे ते उत्तर अमेरिकेतील लोकांचे सर्वात जुने जीवाश्म आहेत. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, मानवी पायाचे ठसे किती जुने आहेत? हे शोधण्यासाठी अभ्यासात डेटिंगच्या दोन तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. असे आढळून आले आहे की हे ट्रॅकवे २३००० ते २१००० वर्ष जुने असल्याचे दर्शवतात. याचा अर्थ ते हिमयुगातील सर्वात थंड भाग ‘लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम’ (२६,५०० ते १९,००० वर्षांपूर्वीच्या) काळापासूनचे आहेत.या शोधामुळे पुरातत्वशास्त्रज्ञांची विचारसरणी बदलली आहेपुरातत्वशास्त्रज्ञांचं असं मत होतं की, क्लोव्हिस लोक हे १३ हजार वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत आलेले पहिले मानव होते. केवळ गेल्या काही दशकांमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना अमेरिकेच्या प्री-क्लोव्हिसमध्ये किंवा १३ हजार वर्षांपूर्वी राहणाऱ्या लोकांचे ठोस पुरावे सापडले आहेत, परंतु त्यापैकी अनेक ठिकाणी पुरावे ठोस नव्हते किंवा ते क्लोव्हिसपेक्षा काही हजार वर्षे जुने होते. होतेव्हाईट सँड्स ट्रॅकवे आता उत्तर अमेरिकेतील मानवांचा थेट पुरावा असलेली सर्वात जुनी साइट आहे आणि पहिल्या अमेरिकन लोकांच्या आगमनाची तारीख लक्षणीयरीत्या मागे टाकते. कॅथलीन स्प्रिंगरसोबत या अभ्यासाचे सह-नेतृत्व करणारे जेफ्री पिगाटी म्हणाले, 'जेव्हा पहिला पेपर आला तेव्हा अनेक पुरातत्वशास्त्रज्ञांनी आमच्याशी संपर्क केला. ही फक्त वेळेची बाब आहे. आम्हाला माहित होते की लोक इथे आधी होते, असं ते म्हणाले. आता आमच्याकडेलास्ट ग्लेशियल मॅक्झिममच्या काळात लोक असल्याचा ठोस पुरावा आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Rowjdam

No comments:

Post a Comment