Breaking

Tuesday, October 31, 2023

त्रिकोणी प्रेम बेतलं जीवावर! लिव्ह-इनमधील प्रेयसीसोबत तरुणाचे प्रेमसंबंध; रागात प्रियकराचे धक्कादायक कृत्य https://ift.tt/c61WGPC

नागपूर: इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जटतरोडी परिसरात तिघांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. त्याच्या लिव्ह इन पार्टनरसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आरोपीने त्याच्या दोन नातेवाईकांसह ८ गुन्हे केले होते. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन आरोपींनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असे मृतकाचे नाव आहे. तर मुख्य आरोपी हा त्याचा चुलत भाऊ गब्बर उर्फ राजेश चव्हाण आहे. आरोपी गब्बर हा गेल्या १२ वर्षांपासून आरती नावाच्या महिलेसोबत पती-पत्नी म्हणून राहत होता. गब्बर हा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये काम करतो. तर नितीन महाल येथील सिनेमा हॉलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. महिनाभरापूर्वी आरोपी गब्बरने भाड्याचे घर बदलले असता त्याने नातेवाईक नितीनला घरातील सामान हलवण्यासाठी मदतीसाठी बोलावले होते. त्यादरम्यान नितीन त्यांचा घरी येऊ लागला.दरम्यान आरोपीच्या पत्नीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सुमारे १० दिवसांपूर्वी दोघांच्याही कुटुंबियांना हा प्रकार कळला. त्यामुळे कुटुंबियांनी मिळून त्यांची समजूत घातली. असे असतानाही नितीनने आरतीला तिच्या घरी भेटणे सुरूच ठेवले. त्यानंतर आरोपी गब्बरने दारूच्या नशेत आपल्या लिव्ह-इन पार्टनरला मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. यामुळे इमामवाडा पोलिसांनी नितीन, आरती आणि आरोपी गब्बरला पोलीस ठाण्यात बोलावले होते. तेथे पोलिसांनी गब्बरवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. पत्नीला मारहाण न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. पोलीस ठाण्यातूनच आरती मृतक नितीनसोबत तिच्या इमामवाडा येथील भाड्याच्या घरात आली होती. तर आरोपी गब्बर तेथून एकटाच निघून गेला. मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गब्बर त्याचे सहकारी रितेश झांझोटे आणि अनिकेत झांझोटे यांच्यासमवेत घरी पोहोचला. तेथे त्याला नितीन त्याच्या पत्नीसह त्याच्याच घरी आढळला. यानंतर गब्बरने त्याचा साथीदारांसह नितीनवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. दरम्यान त्याची लिव्ह इन पार्टनर आरतीने पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून पळून गेले होते. पोलिसांना नितीन घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गब्बर आणि त्याचा साथीदार रितेशला ताब्यात घेतले तर अनिकेतचा शोध सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/AuqQSFV

No comments:

Post a Comment