Breaking

Thursday, October 26, 2023

महिलेच्या त्रासाला कंटाळून त्या पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल? अखेर पोलिसांकडून तिघांना अटक, कारण... https://ift.tt/kdJPZAr

नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी मृत पोलिसाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह तिघांना अटक केली आहे. गोविंद मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. उस्माननगर ते कलंबर रोड ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली होती. मृत गोविंद मुंडे हे यशोसाई हॉस्पिटल येथील न्युरोसर्जन डॉ ऋतुराज जाधव यांचे अंगरक्षक होते. ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका नर्सशी त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघे जण फोन वर बोलत होते. मला तुम्ही आवडता असं म्हणून त्या नर्सकडून पोलीस कर्मचाऱ्याला नेहमी लग्नाचा तगादा लावला जात होता. गोविंद मुंडे हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.सदर महिला आणि तिच्या आई वडिलांकडून मुंडे यांना मानसिक त्रास सुरूच होता. हे प्रकरण समजल्यानंतर मृताच्या पत्नीने सदर महिलेला फोनवरून संपर्क साधून समजूत काढण्याची प्रयत्न केली. पण मुंडे यांना मानसिक त्रास देणे सुरू होते. या त्रासाला कंटाळून गोविंद मुंडे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली अशी तक्रार पत्नी जान्हवी मुंडे यांनी दिली. तक्रारी वरून उस्माननगर पोलिसांनी कोमल केंद्रे, बालाजी केंद्रे आणि कोमलच्या आई विरोधातआत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. दरम्यान गोविंद मुंडे यांच्या आत्महत्येने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GxKbjU3

No comments:

Post a Comment