Breaking

Sunday, October 29, 2023

नो ट्रॅफिक! या शहरात उभारणार ५ नवे उड्डाणपूल, राज्य सरकारकडून ७९२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी https://ift.tt/Nk7oU9I

नागपूर : शहरातील वाहनांच्या संख्येत झालेली वाढ व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा म्हणून शहरात आणखी पाच उड्डाणपूलांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाकरीता राज्याच्या नगर विकास विभागाने ७९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.अलिकडच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. यात आता आणखी पाच नव्या उड्डाणपुलांची भर पडणार आहे. दक्षिण, पूर्व व मध्य नागपुरातील रस्त्यांवर उड्डाणपुलाची गरज व्यक्त करीत आमदार कृष्णा खोपडे यांनी केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महारेलने पाच उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला होता. केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या उड्डाणपुलांचे सादरीकरण केले होते. यानंतर जून महिन्यात या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. आता नगरविकास विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील उड्डाणपुलांच्या संख्येत वाढ होणार आहे. महारेलच्यावतीने या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघावयास मिळत आहे. त्यामुळे या समस्येकडे केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. या पुलांसंदर्भात महारेलकडून सादरीकरण करण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उड्डाणपुलांना मान्यता दिली. त्यानंतर नगर विकास विभागाने या उड्डाणपुलांसाठी ७९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महारेल लवकरच यासंदर्भात निविदा काढेल. डिसेंबर महिन्यात याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

प्रस्तावित मार्ग व प्रकल्पांची किंमत

- रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्स्चेंज चौक ते भांडे प्लॉट : २५१ कोटी- चंद्रशेखर आझाद चौक-गंगाजमुना ते मारवाडी चौक : ६६ कोटी- लकडगंज पोलिस स्टेशन ते वर्धमाननगर : १३५ कोटी- नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक : ६६ कोटी- वर्धमाननगर ते निर्मलनगरी, उमरेड रोड : २७४ कोटी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wKuG782

No comments:

Post a Comment