म. टा. प्रतिनिधी, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज, शुक्रवारी पुणे शहर-जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेत आहेत. पवार यांच्या पालकमंत्रिपदामुळे नाराज झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार, पदाधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार की नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रिपद हे आता पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. पवार यांच्या नियुक्तीनंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर होता, तर पाटील यांनी आपण सहपालकमंत्री असल्याचे जाहीर केले आहे. पवार पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात येत असून, त्यांनी ‘महावितरण’, सरकारी रुग्णालये; तसेच ‘पीएमआरडीए’च्या प्रश्नांबाबत ही बैठक आयोजित केली आहे. गणेशखिंड रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. या संदर्भातही बैठक आयोजित करण्यात आली आहे.पवार यांनी बैठकांचे आयोजन केले असले, तरी या बैठकांना भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार की नाहीत, हा चर्चेचा विषय ठरला आहे. पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झालेला विकासकामांचा निधी गेले तीन महिने रोखल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. तत्कालीन पालकमंत्री पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारही केली होती. या पार्श्वभूमीवर पवारांकडून शुक्रवारी आयोजिण्यात आलेल्या बैठकांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या प्रश्नांसंदर्भात बैठकाशहर आणि जिल्ह्यातील महावितरण कंपनीकडे असलेल्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. याशिवाय नांदेड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सरकारी रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. ‘पीएमआरडीए’शी संबंधित प्रश्नांवरही चर्चा होणार आहे.बावनकुळे ‘बारामती’तभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘महाविजय २०२४’ या उपक्रमांतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा आज, शुक्रवारी (दि. १३) करणार आहेत. पालकमंत्री पवार विकासकामांचा आढावा घेत असताना बावनकुळे ‘बारामती’मध्ये पक्षविस्तारासाठी कार्यरत असणार आहेत. धायरी परिसरात आणि त्यानंतर दौंड येथे त्यांचे जाहीर कार्यक्रम आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात बावनकुळे काय भूमिका घेतात, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LvXlbIc
No comments:
Post a Comment